India Iran Relations : खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र राज्यमंत्री आणि बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित

नवी दिल्ली : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या राजकीय अंत्यसंस्कार सोहळ्यात भारतही सहभागी होणार आहे. इराणी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यात भारत सरकारचे प्रतिनिधित्व बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा करणार आहेत.


इराणी सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खामेनेई यांच्या राजकीय अंत्यसंस्कार आणि दफनविधीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर भारताने या उच्चस्तरीय शिष्टमंडळाला इराणमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.



अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या खामेनेई यांच्या स्मरणार्थ ४ ते ९ जुलैदरम्यान आठवडाभर राजकीय शोक आणि अंत्यसंस्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.


इराणी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ४ आणि ५ जुलै रोजी खामेनेई यांचे पार्थिव तेहरानमधील ग्रँड मोसल्ला संकुलात जनतेच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच ४ ते ९ जुलैदरम्यान इराणमधील विविध शहरांमध्ये होणाऱ्या अंत्यसंस्कार कार्यक्रमांमध्ये जगभरातील अनेक मान्यवर आणि लाखो नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.



२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यांची राजकीय अंत्ययात्रा ६ जुलै रोजी काढण्यात येणार असून, अधिकृत शोककाळात तेहरान प्रांतात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक