NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने या प्रकरणातील १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ११ जुलै २०२६ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्वीची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर, संबंधित १० आरोपींना तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यात यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल, धनंजय लोखंडे, तेजस हर्षद शहा, शुभम खैरनार, मनीषा वाघमारे, मनीषा हवालदार आणि डॉ. मनोज शिरुरे यांचा समावेश आहे. प्रल्हाद कुलकर्णी आणि शिवराज रघुनाथ मोटेगावकर हे दोन आरोपी आधीच ८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. या सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वतीने वरिष्ठ सरकारी वकील व्ही. के. पाठक आणि तपास अधिकारी बी. पी. राजू यांनी बाजू मांडली.



सीबीआयने या प्रकरणातील पेपरफुटीच्या गुंतागुंतीच्या साखळीचा पर्दाफाश केला आहे. तपासात समोर आले आहे की, शुभम खैरनारने सर्वप्रथम यश यादवला पेपर लीक केला होता. त्यानंतर, यश यादवने हा पेपर १० लाख रुपयांच्या मोबदल्यात मांगीलाल बिवालला दिला. मांगीलालने पुढे हा पेपर आपल्या मुलाला (विकास बिवाल) आणि दिनेश बिवालला उपलब्ध करून दिला. मांगीलाल बिवालने हा पेपर केवळ स्वतःच्या मुलासाठीच वापरला नाही, तर अन्य उमेदवारांनाही १२ लाख रुपयांच्या मोबदल्यात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.



तपास यंत्रणेला मांगीलाल बिवालच्या मोबाईल फोनमध्ये नीटपरीक्षेची प्रश्नपत्रिका सापडली आहे, जो या प्रकरणातील एक भक्कम पुरावा मानला जात आहे. १२ मे रोजी एका सरकारी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्याशी संबंधित कलमांन्वये सीबीआयने कारवाई केली आहे. या प्रकरणातील मनीषा वाघमारे हिचा जामीन अर्ज ९ जून रोजी न्यायालयाने फेटाळून लावला होता.
Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन