Bank Holidays in July : जुलै महिन्यात तब्बल १२ दिवस बँका राहणार बंद

मुंबई : जुलै महिन्याच्या सुरुवातीला बँक व्यवहारांचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येत्या जुलै महिन्यात देशभरात तसेच विविध राज्यांमध्ये एकूण १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये रविवार, दुसरा व चौथा शनिवार तसेच प्रादेशिक सण आणि विशेष स्थानिक दिनांचा समावेश आहे. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊन होणारी कामे आधीच नियोजन करून पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. (Bank Holidays in July)


मिळालेल्या माहितीनुसार ५ जुलै रोजी रविवार असल्यामुळे देशभरात बँका बंद (Bank Holidays in July) राहतील. ६ जुलै रोजी मिझोराममधील आयझॉल येथे MHIP दिवसानिमित्त सुट्टी असेल. ९ जुलै रोजी शिलाँगमध्ये बेहदिएनखलाम सणामुळे बँक व्यवहार ठप्प राहतील. ११ जुलै रोजी दुसरा शनिवार आणि १२ जुलै रोजी रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील. त्यानंतर १६ जुलै रोजी रथ यात्रा, कांग आणि हरेला या सणांमुळे भुवनेश्वर, देहरादून आणि इंफाल येथे बँका बंद राहतील. १७ जुलै रोजी तिरोत सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिलाँगमध्ये सुट्टी असेल. १८ जुलै रोजी गंगटोकमध्ये द्रुक्पा त्शे जी पर्वामुळे बँका बंद राहतील. १९ जुलै रोजी पुन्हा रविवार असल्याने देशभरात बँक व्यवहार थांबतील. २२ जुलै रोजी अगरतळा येथे खारची पूजा असल्याने स्थानिक सुट्टी असेल. २५ जुलै रोजी चौथा शनिवार आणि २६ जुलै रोजी रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील. अशा प्रकारे महिनाभरात विविध कारणांमुळे बँक व्यवहारांवर परिणाम दिसून येणार आहे. (Bank Holidays in July)



बँका बंद असल्या तरी ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही कारण डिजिटल सेवा मात्र सुरळीत सुरू राहणार आहेत. यामध्ये UPI, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग तसेच विविध अॅप्सच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे किंवा ऑनलाइन खरेदी यासारखी कामे सहज पूर्ण होऊ शकतील. (Bank Holidays in July)



रोख रक्कम जमा करण्याची गरज असल्यास ग्राहक बँकेबाहेरील कॅश डिपॉझिट मशीनचा वापर करू शकतात. या सुविधेमुळे बँक शाखा बंद असतानाही खात्यात पैसे जमा करणे शक्य होते. त्यामुळे जुलै महिन्यात बँक सुट्ट्यांचे दिवस लक्षात घेऊन आर्थिक व्यवहारांचे योग्य नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. (Bank Holidays in July)

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Mumbai Goa Highway Accident : मुंबई गोवा महामार्गावर अपघात, दोघींनी उडवल्यानंतर वाहन २५ फूट खोल खड्ड्यात

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर लवेल येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटले

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

Eknath Shinde : डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांसह महिला व युवकांच्या पाठीशी खंबीर - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

परभणी : राज्यातील शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणी व युवकांच्या पाठीशी केंद्र व राज्यातील हे डबल इंजिन सरकार खंबीरपणे