Work from home : महिन्याला २.८ लाखांचा पगार, पण काम ऐकून बसेल धक्का ! 'ब्रेकअप' घडवण्यासाठी कंपनीची भन्नाट भरती; अटी काय ?

Chief Breakup Officer : नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महिन्याला २.८ लाखांचा पगार आहे त्यामुळे लाईफ सेट अशी नोकरी. विशेष म्हणजे या नोकरीत ऑफिसचं काम नाही, टार्गेट नाही. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल काम नक्की आहे तरी काय ? तर या नोकरीत लोकांचं ब्रेकअप करून द्यायचं आहे. होय... एका ग्लोबल डेटिंग कंपनीने अशीच एक भन्नाट नोकरी जाहीर केली असून, त्यासाठी महिन्याला तब्बल २ लाख ८० हजार रुपयांचा पगार दिला जाणार आहे.



'चीफ ब्रेकअप ऑफिसर' पदासाठी भरती प्रक्रिया


जागतिक डेटिंग प्लॅटफॉर्म Dating.com ने 'चीफ ब्रेकअप ऑफिसर' (Chief Breakup Officer) या अनोख्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही पार्ट-टाईम आणि वर्क फ्रॉम होम (Work from home) नोकरी असून, निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा सुमारे ३ हजार डॉलर्स, म्हणजेच जवळपास २ लाख ८० हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या व्यक्तीचे मुख्य काम असेल, जे लोक स्वतः आपल्या जोडीदाराशी ब्रेकअपबद्दल (Breakup) बोलण्याची हिंमत करू शकत नाहीत, त्यांच्या वतीने समोरच्या व्यक्तीशी संवाद साधून नातं सन्मानपूर्वक संपवून देणे.



पदनिर्मिती मागचं कारण आणि अटी


कंपनीच्या मते, अनेक जण नातं संपलं आहे हे माहीत असूनही समोरच्याशी स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. त्यामुळे हा अधिकारी दोन्ही बाजूंचा आदर राखत, कोणाच्याही भावना न दुखावता संवाद साधेल आणि कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेईल. या नोकरीसाठी काही आगळ्यावेगळ्या अटीही ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवाराने आयुष्यात किमान तीन ब्रेकअप अनुभवलेले असावेत. भावनिक परिस्थिती शांतपणे हाताळण्याची क्षमता, उत्तम संवादकौशल्य आणि आधुनिक डेटिंग संस्कृतीची चांगली समज असणे आवश्यक आहे.


कंपनीचे म्हणणे आहे की, मित्र-मैत्रिणी जेव्हा नातेसंबंधातील अडचणींवर सल्ला घेण्यासाठी सर्वात आधी ज्या व्यक्तीकडे धाव घेतात, तीच व्यक्ती या पदासाठी योग्य ठरेल. या भरतीमागचा उद्देशही तितकाच महत्त्वाचा आहे. नातं संपवताना अचानक संपर्क तोडण्याची, म्हणजेच 'घोस्टिंग'ची वाढती प्रवृत्ती रोखणे हा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीच्या सर्वेक्षणानुसार, जवळपास ८४ टक्के Gen-Z आणि मिलेनियल्स कधी ना कधी घोस्टिंगचे बळी ठरले आहेत. त्यामुळे नातं संपवतानाही स्पष्ट संवाद आणि परस्परांचा आदर राखला जावा, या उद्देशाने ही अनोखी नोकरी तयार करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार