Nashik Crime News : लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार ; सोशल मीडियाची ओळख धोक्याची

नाशिक : सोशल मीडियावर ओळख झाल्यावर प्रेमसंबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नाचं आमिष दाखवत सतत १८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार नाशिकमधील पिंपळगाव खांब परिसरात घडला आहे.


स्नॅपचॅटवरील ओळख...


नाशिकरोड परिसरातील पिंपळगाव खांब (वडनेर रोड) भागात राहणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थिनीची 'स्नॅपचॅट' (Snapchat App) या सोशल मीडिया ॲपद्वारे स्वरूप अमोल संधान(Swaroop Amol Sandhan) याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तरुणीशी जवळीक साधली, प्रेमसंबंध निर्माण केले आणि तिला लग्नाचे खोटे आश्वासन दिले. स्वरुपने पीडितेचे लैंगिक शोषण करून नंतर तिच्या जातीवरून छळ करत लग्नास नकार दिल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.



पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे


पीडित तरुणीने सांगितले की आरोपीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणी जेव्हा लग्नाचा विषय काढायची तेव्हा आरोपी तिला शिवीगाळ करायचा आणि मारायचा. तू खालच्या जातीची आहेस तुझी लायकी आहे का माझ्याशी लग्न करायची ? या शब्दात तो बोलायचा. त्याची आणि माझी ओळख ६ महिन्यांपासून आहे. सुरुवातीला त्याचं वागणं खूप चांगलं होत पण आमच्यात जेव्हा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले त्या नंतर त्याची वागणूक बदलली, असंही ती म्हणाली.


आरोपी अद्याप फरार


पीडित आरोपीला आपली फसवणूक आणि मानसिक तसेच शारीरिक छळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडितेचे वय विचारात घेऊन पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपाससुरु आहे मात्र आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी? आज लागणार कॉलेज अलॉटमेंट लिस्ट; विद्यार्थ्यांनी ‘हे’ नक्की करा!

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी

BMC News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांमध्येच धुसफुस; व्हॉट्सअप ग्रुपवरुन बाहेर पडल्याने नाराजी उघड

- महापालिका आयुक्तांना आता याप्रकरणात लक्ष घालण्याची वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या

Water Storage Declining : महापालिका धरणांमधील पाणीसाठा घटतोय

- तब्बल ९० टक्क्यांच्या पुढे गेलेला साठा चार दिवसांत दीड टक्क्यांनी झालाय कमी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई पाणी

Global Warming : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका; मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा

- भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) भविष्यात उद्भवणाऱ्या जागतिक तापमान वाढ (ग्लोबल

Tariff Bill : भारतावर 100% टॅरिफची टांगती तलवार! अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर; रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवर मोठी कारवाई

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांवर परिणाम करणारी मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाकडून तेल आणि इतर

Ganeshotsav 2026 ST Buses : बाप्पाच्या आगमनासाठी एसटी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरमधून धावणार शेकडो जादा बसेस; ‘या’ तारखेपासून विशेष सेवा

मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे.