PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत! पर्यावरण संवर्धनातील नेतृत्वासाठी 'Guardian of the Blue Horizon' पुरस्कार प्रदान

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पर्यावरण संवर्धन, हवामान बदलावर प्रभावी नेतृत्व आणि शाश्वत विकासासाठी दिल्या जाणाऱ्या सेशेल्सच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने म्हणजेच 'Guardian of the Blue Horizon' ने गौरविण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण, ब्लू इकॉनॉमी आणि हवामान कृती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


सेशेल्स सरकारने दिलेल्या राष्ट्रपती प्रशस्तीपत्रात पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी शाश्वत विकास, हरित अर्थव्यवस्था, समुद्री संसाधनांचे जबाबदारीने व्यवस्थापन आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. तसेच लहान बेट राष्ट्रांना (Small Island Developing States) दिलेल्या पाठबळामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.



'हा सन्मान हवामान बदलाशी लढणाऱ्या सर्व देशांना समर्पित' :


हा सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर भावना व्यक्त करत म्हटले, "‘Guardian of the Blue Horizon’ हा सन्मान मिळाल्याने मी नम्र झालो आहे. हा पुरस्कार मी हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करणाऱ्या आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरण संरक्षणाला आपली जबाबदारी मानणाऱ्या जगातील सर्व देशांना समर्पित करतो."



जागतिक स्तरावर आणखी एक मोठा गौरव :


पर्यावरण आणि शाश्वत विकास क्षेत्रातील योगदानासाठी पंतप्रधान मोदींना मिळालेला हा आणखी एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. यापूर्वी मे २०२६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) अन्नसुरक्षा, कृषी क्षेत्रातील परिवर्तन आणि शाश्वत शेतीला चालना दिल्याबद्दल त्यांना 'Agricola Medal' प्रदान केला होता. (PM Narendra Modi)


तसेच २०१८ मध्ये दक्षिण कोरियाचा प्रतिष्ठेचा 'Seoul Peace Prize' आणि त्याच वर्षी संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च 'Champions of the Earth Award' हा पुरस्कारही पंतप्रधान मोदींना मिळाला होता. हवामान बदलाविरोधातील नेतृत्व आणि जागतिक पर्यावरणीय सहकार्याला चालना दिल्याबद्दल त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. (PM Narendra Modi)



भारताच्या पर्यावरणीय नेतृत्वाला जागतिक मान्यता :


सेशेल्सकडून मिळालेला हा सर्वोच्च सन्मान भारताच्या पर्यावरणपूरक विकास धोरणाला आणि हवामान बदलाविरुद्धच्या जागतिक प्रयत्नांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाला मिळालेली आणखी एक मोठी आंतरराष्ट्रीय मान्यता मानली जात आहे. पर्यावरण संरक्षण, हरित विकास आणि समुद्री परिसंस्थेच्या संवर्धनासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचेही या पुरस्कारातून कौतुक करण्यात आले आहे.




Comments
Add Comment

Tibet dam failure alert : चिखलात बेपत्तांचा शोध अन् मदतकार्य सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा इशारा; तिबेटमध्ये पाण्याचा बांध फुटल्याची भीती

नेपाळ : नेपाळमध्ये तिबेटच्या हिमकडा कोसळण्याने आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडच्या विनाशातून सावरण्याचा प्रयत्न सुरू

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने

Nepal Flash Flood 2026 : नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! १६० जणांचा मृत्यू; ७५० हून अधिक बेपत्ता, १३३ भारतीयांचा समावेश

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. भोटेकोशी नदीला

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'