सेंट लुईस : भारतीय बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाने फॅबियानो करूआनाचा पराभव करत इतिहास रचला आहे. सेंट लुईसमध्ये झालेल्या Grand Chess Tour Finalsच्या अंतिम सामन्यात प्रज्ञानानंदाने १५-१३ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. या विजयासह तो Grand Chess Tour Finals जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी प्रज्ञानानंदासमोर मोठं आव्हान होतं. तो तब्बल सहा गुणांनी पिछाडीवर होता. पहिल्या क्लासिकल गेममध्ये करूआनाने ६-० अशी आघाडी घेतली, तर दुसरा क्लासिकल सामना ३-३ असा बरोबरीत राहिला.
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही सुरू असलेले आंदोलन हे काँग्रेसच्या ...
मात्र, प्रज्ञानानंदाने हार न मानता जबरदस्त पुनरागमन केलं. त्याने दोन्ही रॅपिड गेम जिंकत सामन्यात जोरदार कमबॅक केलं. त्यानंतर ब्लिट्झ गेम्समध्येही त्याने आवश्यक नियंत्रण राखलं आणि अखेर एकूण १५-१३ असा विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं. या ऐतिहासिक विजेतेपदासाठी प्रज्ञानानंदाला तब्बल २ लाख अमेरिकन डॉलरचं बक्षीस मिळालं आहे. भारतीय बुद्धिबळासाठीही हा मोठा क्षण मानला जात आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अन्य नेत्यांनी शुक्रवारी देशवासीयांना ...
विजयानंतर प्रज्ञानानंदाने या स्पर्धेचं महत्त्व अधोरेखित केलं. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेनंतर Grand Chess Tour ही जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक असल्याचं त्याने म्हटलं. या स्पर्धेचं विजेतेपद मिळवणं आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचंही त्याने सांगितलं. विशेष म्हणजे, प्रज्ञानानंदाने प्रतिकूल परिस्थितीतून केलेलं हे पुनरागमन त्याच्या मानसिक ताकदीचं आणि दबावाखाली खेळण्याच्या क्षमतेचं उत्तम उदाहरण ठरलं आहे. भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात प्रज्ञानानंदाच्या या विजयाची नोंद आता एका ऐतिहासिक अध्यायाप्रमाणे झाली आहे.