Nashik News : नाशिकमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, पोलीस तपास सुरु

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील वडाळा नाका परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये एका तरुणाचा मृतदेह (Deathbody) आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी दुपारी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे हॉटेल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, अजित पठाण असं मृत तरुणाचे नाव होते. मृत अजित पठाण हे मूळ मुंबईतील वांद्रा येथील रहिवासी असून, सध्या जुने नाशिक येथील बावनपुरा परिसरात वास्तव्यास होते.

नेमकं काय घडलं ?


अजित पठाण हे आपल्या दोन मित्रांसह हॉटेलमध्ये मुक्कामासाठी आले होते. रविवारी सकाळी त्यांचे दोन्ही मित्र नाश्त्यासाठी खाली गेले असता अजित पठाण हे रूममध्येच थांबले होते. नाश्ता करून परत आल्यानंतर रूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अनेकदा आवाज देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने मित्रांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी अजित पठाण हे रूममध्ये मृतावस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, अजित पठाण यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूमागील कारण समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते आणि त्यांची टीम करत आहे.
Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित १८ शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या