'Mirzapur: The Movie' : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर इंटरनेटवर सुपरहिट! रिलीज होताच YouTube ट्रेंडिंगमध्ये #1

मुंबई : अखेर चाहत्यांची बहुप्रतीक्षित प्रतीक्षा संपली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रिलीजच्या काही तासांतच हा टीझर YouTube ट्रेंडिंगमध्ये थेट #1 स्थानावर पोहोचला असून, इंटरनेटवर ‘भौकाल’ची जोरदार चर्चा रंगली आहे. या टीझरमुळे ‘मिर्झापूर’च्या सिनेमॅटिक विश्वाची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ('Mirzapur: The Movie')


टीझरमध्ये पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा आपल्या लोकप्रिय भूमिकांमध्ये पुन्हा एकदा प्रभावी अंदाजात दिसत आहेत. ‘मिर्झापूर’ची ओळख असलेली दमदार अॅक्शन, रक्तरंजित संघर्ष, सत्तेची लढाई आणि तुफान संवाद यांची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेली ही फ्रँचायझी आता मोठ्या पडद्यावर आणखी भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ('Mirzapur: The Movie')


टीझरमधील हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्स, सिनेमॅटिक व्हिज्युअल्स आणि लक्षवेधी डायलॉग्समुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. #MirzapurTheMovie हा हॅशटॅगही वेगाने ट्रेंड होत असून, अनेकांनी हा टीझर आतापर्यंतचा सर्वात दमदार असल्याचे म्हटले आहे. चाहत्यांकडून मिळालेल्या या भरभरून प्रतिसादानंतर निर्मात्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत म्हटले, "YouTube वर #MirzapurTheMovie चा टीझर #1 वर ट्रेंड करत आहे! आता खरा भौकाल ४ सप्टेंबरला सिनेमागृहांमध्ये पाहायला मिळेल." ('Mirzapur: The Movie')



चित्रपटात पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा यांच्यासोबत अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौड, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस. चौहान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या दमदार स्टारकास्टमुळे ‘मिर्झापूर’च्या विश्वात आणखी अनेक नवे ट्विस्ट आणि संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे संकेत टीझरमधून मिळतात. ('Mirzapur: The Movie')


Amazon MGM Studios आणि Excel Entertainment यांच्या प्रस्तुतीखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून, कथा आणि पटकथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, कासिम जगमागिया आणि विशाल रामचंद्रनी हे सह-निर्माते आहेत. ('Mirzapur: The Movie')



बहुचर्चित ‘मिर्झापूर: द मूव्ही’ हा चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ('Mirzapur: The Movie')




Comments
Add Comment

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित