US-Iran War : अमेरिका-इराण युद्धविरामानंतर पुन्हा संघर्ष भडकला; दोन्ही बाजूंनी हल्ले

तेहरान : पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तरादाखल बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. या घडामोडींमुळे दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतरिम युद्धविराम करारावर गंभीर संकट निर्माण झाले आहे. रविवारी पहाटे कुवेतवर झालेला हल्ला हा युद्धविरामानंतरचा पहिला मोठा हल्ला मानला जात आहे.



शनिवारी उशिरा रात्री अमेरिकन नौदल (U.S. Navy)आणि हवाई दलाच्या (U.S. Air Force) लढाऊ विमानांनी होर्मुझ सामुद्रधुनी आणि तिच्या आसपासच्या भागातील इराणच्या १० लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले.इराणने एम/टी किकू या तेलवाहू जहाजावर ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही कारवाई केल्याचे सांगितले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (यू.एस. सेंट्रल कमांड – सेंटकॉम) ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे, “एम/टी किकूवरील इराणच्या ड्रोन हल्ल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकन नौदल आणि हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील इराणच्या १० लष्करी ठिकाणांवर हल्ले केले.”(US-Iran War)


अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या इराणनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. इराणने कुवेत आणि बहरीन येथील अमेरिकेच्या आठ लष्करी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. यात कुवेतमधील अली अल सालेम हवाई तळ तसेच बहरीनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्याला (फिफ्थ फ्लीट) लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने स्पष्ट केले की, इराणच्या लष्करी तळांवरील अमेरिकन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली.



दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या समाजमाध्यमावर लिहिले की, “इराणने पुन्हा एकदा युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्यामुळे अमेरिकन विमानांनी इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवण केंद्रांवर तसेच किनारपट्टीवरील रडार केंद्रांवर हल्ले केले आहेत. ते कदाचित कधीच धडा शिकणार नाहीत. अशी वेळ येऊ शकते की आम्हाला अधिक संयम दाखवता येणार नाही आणि आम्ही अत्यंत यशस्वीपणे सुरू केलेले काम लष्करी कारवाईद्वारे पूर्ण करण्यास भाग पडू. तसे झाले, तर इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अस्तित्वच संपुष्टात येऊ शकते.” यानंतर इराणनेही अमेरिकेला इशारा देत म्हटले आहे की, युद्धविरामाचे उल्लंघन झाल्यास संभाव्य शांतता करार धोक्यात येऊ शकतो.(US-Iran War)



दरम्यान, बहरीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, इराणकडून अनेक ड्रोन बहरीनच्या दिशेने पाठवण्यात आले होते. या हल्ल्यामुळे नागरिक आणि रहिवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाल्याचे मंत्रालयाने नमूद केले. मात्र, या हल्ल्यात कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची तातडीने पुष्टी झालेली नाही.कुवेतच्या लष्कराने दावा केला की, इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच पाडण्यात यश आले. या हल्ल्यातही कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. इराणच्या हल्ल्यानंतर कुवेतमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुवेतच्या लष्कराने हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense System) पूर्णपणे सक्रिय केली असून, “देशावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हवाई संरक्षण व्यवस्था तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहे,” असे लष्कराने सांगितले.(US-Iran War)

Comments
Add Comment

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Hyperdontia Case : ११ वर्षाच्या मुलीच्या तोंडात असं काही पाहून डॉक्टरही झाले हैराण; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

Hyperdontia Case : दातदुखीच्या त्रासामुळे ११ वर्षांच्या मुलीला दंतवैद्याकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान

Nepal Flash Flood China : नेपाळमधील महापुरामागे ‘मेड इन चायना’चा हात? शी जिनपिंग यांच्या धोरणांवर गंभीर आरोप

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठी हानी झाली. तिबेटच्या दिशेने

Nepal Flash Flood 2026 : नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! १६० जणांचा मृत्यू; ७५० हून अधिक बेपत्ता, १३३ भारतीयांचा समावेश

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. भोटेकोशी नदीला

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह