मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची माहिती अभ्यासण्यासाठी शहरात तसेच अनेक ठिकाणी नियमितपणे वायु सर्वेक्षण करणे व प्रदूषकांची वास्तव स्थितीदर्शक पातळी नागरिकांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून पाच ठिकाणी वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र उभारले जाणार आहे. यासाठी तब्बल १७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


भारत सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत प्रदूषित शहरातील वायु प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने प्रदूषित शहराचा कृती आराखडा मंजूर केलेला आहे. महाराष्ट्रातील अधिक प्रदूषित असणाऱ्या १८ शहरांमध्ये मुंबई शहराचा देखील समावेश आहे. महानगरपालिकेचा कृती आराखडा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ऑक्टोबर २०१९ मध्ये मंजूर केलेला आहे. या कृती आराखड्यानुसार शहरातील वाहतूक व्यवस्था, दळणवळण, उद्योगधंदे इत्यादी बाबीवर लक्ष केंद्रीत करुन शहरातील वायु प्रदूषण नियंत्रित करणे गरजेचे आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १८ नोव्हेंबर २००९ च्या सूचनापत्रात एकूण १२ प्रदूषकांची हवेच्या दर्जाची राष्ट्रीय मानके निर्धारीत करण्यात आलेली आहेत. त्यानुसार वातावरणातील विविध (Tourism) प्रदुषित घटकांचे मापन होणे आवश्यक आहे सध्या मुंबईत एकूण २८ वायू सर्वेक्षण केंद्र कार्यरत आहे.प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची माहिती अभ्यासण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी नियमितपणे वायु सर्वेक्षण करणे व प्रदूषकांची वास्तव स्थितीदर्शक पातळी नागरिकांना उपलब्ध करुन देणे अभिप्रेत आहे.


त्यानुसार बहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत आणखी 0५ ठिकाणी वास्तव स्थितीदर्शक सतत वातावरणीय वायु गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे निर्माण करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध स्थानानुसार हवेच्या गुणवत्तेची वर्तमान स्थिती, वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) बाबतची अचूक माहिती उपलब्ध करून देणे,हे आहे असे पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.या वायू सर्वेक्षण केंद्राच्या माध्यमातून मुंबईतील वाढत्या वायु प्रदूषण समस्येवर उपाययोजना शोधण्यास मदत होईल. तसेच प्रदूषणा संदर्भात योजना आखण्यास धोरण बनवताना माहिती उपलब्ध होईल. प्रदूषण नियंत्रणास सुलभता निर्माण करुन स्वच्छ व हरीत मुंबईचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


मुंबईत सद्या असलेल्या वायु सर्वेक्षण केंद्राचा क्षेत्र वगळून म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तथा बृहन्मुंबई महानगरपालिका व सफर मुंबई प्रकल्प यांच्या अखत्यारीतील वायु सर्वेक्षण केंद्रांच्या जागांवर होणार नाही याची खबरदारी घेण्यात आलेली असल्याचेही महापालिकेच्या पर्यावरण विभागाने स्पष्ट केले. तीन वर्षांच्या हमी कालावधीसह तसेच पुढील पाच वर्षांच्या देखभालीसाठी तब्बल १७.५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी इन्विया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.


मुंबईत कुठे उभारले जाणार आहे वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र' सी. डी. देशमुख उद्यान, मुलुंड  (Mulund) (पूर्व). प्रमोद महाजन पार्क (Pramod Mahajan Park), वावर उदचन केंद्र, वादर (पश्चिम). आरे उद्यान छोटा काश्मिर, गोरेगाव (पूर्व). डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन मैदान, दहिसर (पूर्व).महानगरपालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय, खार (एच/पश्चिम).स्वयंचलित वायु सर्वेक्षण केंद्रे स्थापन करण्यामागील उद्दिष्ट्ये हवामान विषयक घटक उदा. तापमान, हवेतील सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा, इत्यादी बाबतची माहिती प्राप्त होईल.प्रत्येक वायु सर्वेक्षण केंद्रावरील प्रदूषण पातळी बाबत माहिती बिएमसी पोर्टलवर उपलब्ध होईल, ही लिंक सीपीसीबी सर्व्हरशी संलग्न असेल. तसेच समीर मोबाईल ऍपद्वारे समाजमाध्यमावर अचुक वेळेत एक्यूआयची माहिती उपलब्ध होईल.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)