Sunil Shetty : १५ महिन्यांची नात इवारा रोज मोदींच्या फोटोला दाखवते लाडूचा प्रसाद, सुनिल शेट्टींचा खुलासा; त्यांच्यात काहीतरी जादुई आहे...

Sunil Shetty : बॉलीवूड अभिनेता सुनिल शेट्टी आपल्या कुटुंबाबद्दल आणि विशेषतः १५ महिन्यांच्या नात इवाराबद्दल नेहमीच प्रेमाने बोलताना दिसत असतात. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी इवाराच्या सकाळच्या एका खास सवयीचा उल्लेख केला. इवारा दररोज सकाळी नरेंद्र मोदी यांच्या फोटोला लाडूचा प्रसाद दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले. यामागे कुणी तिला शिकवले नसून, "त्यांच्यात काहीतरी जादुई आहे," असेही ते म्हणाले.



मी पंतप्रधान मोदींचा चाहता


एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुनिल शेट्टी (Sunil Shetty) यांनी सांगितले की, इवाराची पंतप्रधान मोदींसोबतची पहिली ओळख तिच्या नॅनीमुळे झाली. विमानतळावर एकदा नॅनीने इवाराला मोदींबद्दल सांगितले आणि तेव्हापासून ती त्यांच्याकडे विशेष आकर्षित झाली. या घटनेनंतर इवाराच्या दैनंदिन सवयीतही एक वेगळी गोष्ट दिसू लागली. सुनिल शेट्टी म्हणाले, मी नेहमी सांगतो की मी पंतप्रधान मोदींचा चाहता आहे. हे कोणत्याही राजकीय पक्षामुळे नाही, तर एक नेता म्हणून मला ते प्रेरणादायी वाटतात. मला माझ्या देशावर जितकं प्रेम आहे, तितकंच या व्यक्तीबद्दलही आदर आहे."


त्यांनी पुढे सांगितले, इवारा रोज सकाळी साईबाबांचे पुस्तक उघडते. त्या पुस्तकात मोदीजींचा एक फोटो आहे. ती गणपतीजवळ ठेवलेला लाडू घेते आणि त्या फोटोला प्रसाद दाखवते. हे तिला कुणीही शिकवलेले नाही. आम्हीही कधी तिला तसे करण्यास सांगितले नाही. पण तिच्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळे आकर्षण आहे. त्यांच्यात काहीतरी जादुई आहे.



आजोबांची लाडकी इवारा


अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि के. एल. राहुल (K. L. Rahul) यांच्या घरी २४ मार्च २०२५ रोजी इवाराचा जन्म झाला. केएल राहुल यांच्या वाढदिवसानिमित्त दोघांनी मुलीची चाहत्यांना ओळख करून दिली होती. त्यावेळी तिचे नाव 'इवारा' असल्याचे जाहीर करत त्याचा अर्थ 'देवाची भेट' असा असल्याचेही सांगितले. इवाराच्या जन्मानंतर अथिया आणि राहुल यांनी तिचा चेहरा सार्वजनिकरित्या दाखवलेला नाही. मात्र, वेळोवेळी तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुनिल शेट्टीदेखील अनेक मुलाखतींमध्ये आपल्या नातीबद्दल प्रेमाने बोलताना दिसतात. ते गंमतीने "इवारा म्हणजे अथिया २.०" असेही म्हणतात.



सुनिल शेट्टीचा नवा चित्रपट


दरम्यान, सुनिल शेट्टी यांचा 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Jungle) हा नवा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असून, प्रदर्शनानंतर तो चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं उघड

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने ऑनलाइन महिलांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या काही सोशल

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत