मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चर्चेत आला आहे. चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत असतानाच, त्याच्या नकारात्मक रिव्ह्यूवरून नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी युट्यूबर सूरज कुमार यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचा दावा खुद्द सूरज यांनी सोशल मीडियावर केला आहे. (Toxic Movie)
सूरज कुमार यांनी त्यांना मिळालेल्या नोटीसचा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाबाबत त्यांनी पोस्ट केलेल्या रिव्ह्यूवरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये त्यांच्या ऑनलाइन माध्यमातून चित्रपटाशी संबंधित मजकूर प्रकाशित किंवा प्रसारित केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नोटीस मिळाल्यानंतरही सूरज कुमार यांचा ‘टॉक्सिक’वरील रिव्ह्यू व्हिडीओ ऑनलाइन उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. (Toxic)
मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गुरुवारी ‘एक्स’वर भावनिक ...
दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्मात्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. बंगळूरु येथील अतिरिक्त शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने 22 ऑगस्ट रोजी अंतरिम आदेश देत चित्रपटाबाबत खोटी किंवा बदनामीकारक माहिती प्रसारित करण्यास काही पक्षांना मनाई केली होती. हा आदेश 28 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ( Entertainment News)
या प्रकरणामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून ऑनलाइन रिव्ह्यू आणि सोशल मीडिया कंटेंटवर घेतल्या जाणाऱ्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, ‘टॉक्सिक’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे.
गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यशसोबत कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यश आणि व्यंकट के. नारायण यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ( Bollywood News)