Prajakta Lavangare : गृहनिर्माण संस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीला चालना द्या

अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांचे निर्देश


मुंबई : स्रोतांच्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही, गृहसंस्थांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीसारख्या उपक्रमांना चालना द्यावी, जेणेकरून मुंबईत हरित उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिले आहेत.


ग्रँट रोड येथील ‘डी’ विभाग कार्यालय येथे आज (दिनांक २७ जून २०२६) सकाळी प्राजक्ता लवंगारे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत, प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होत्या.उपआयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, सहायक आयुक्त (D Department)संतोष साळुंके आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.




‘डी’ विभागाच्या हद्दीतील ऐतिहासिक स्थळांचे व्यवस्थापन, रस्त्यांची स्थिती, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचऱ्याचे विलगीकरण, प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन व प्रक्रिया, गृहनिर्माण संस्था स्तरावरील कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, मनुष्य प्रवेशिकांची (Manholes) सद्यस्थिती, सार्वजनिक आरोग्यविषयक बाबी, वृक्ष छाटणी, धोकादायक इमारती, पुरातन वारसा वास्तू आणि धार्मिक स्थळांसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाचे पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे श्रीगणेशोत्सव मूर्ती विसर्जन निमित्त मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या विविध सोयी-सुविधा आदींचा सविस्तर आढावा या भेटीदरम्यान प्राजक्ता लवंगारे यांनी घेतला.तसेच, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत प्रशासकीय विभाग स्तरावर कार्यरत वैद्यकीय यंत्रणांचे कामकाज, लसीकरण, आरोग्य सर्वेक्षण, कीटक निर्मूलन आदींबाबत केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली. प्राथमिक स्तरावरील आरोग्य सुविधा अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देखील प्राजक्ता लवंगारे यांनी यावेळी केल्या.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)