Ganesh Naik : महाराष्ट्राच्या वनहद्दीत पाच वर्षांत साडेतीन लाख झाडांवर कुऱ्हाड

सव्वा लाख झाडे सागवानाची; बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्याचे मोठे आव्हान


मुंबई : निसर्गसंपन्न महाराष्ट्राच्या वनक्षेत्राला बेकायदेशीर वृक्षतोड आणि लाकूड तस्करांच्या टोळ्यांनी पुरते पोखरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत राज्याच्या वनहद्दीतील तब्बल साडेतीन लाखांहून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली असून, यामध्ये सव्वा लाख मौल्यवान सागवान वृक्षांचा बळी गेला आहे. यामुळे शासनाचे ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, राज्याच्या वनवैभवाचे रक्षण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.


विधिमंडळात उपस्थित झालेल्या तारांकित प्रश्नाला वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी छापील उत्तर दिले, त्यातून ही माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेनगाव वनउपक्षेत्रातून शेजारच्या तेलंगणा राज्यात सागवानाची तस्करी झाल्याचे वनमंत्र्यांनी मान्य केले. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागांतर्गत काठापूर बुद्रुक आणि शिंगवे या गावांच्या वनक्षेत्रात अतिशय औषधी अशा 'खैर' प्रजातीच्या ६१ झाडांची (61 trees) कत्तल झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी वनगुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जळगावच्या यावल वनविभागातील पाडळसा शिवारात मालकी हक्काच्या ३० झाडांची अवैध तोड झाली, तर नाशिकच्या पेठ वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचे ४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.




'टास्क फोर्स' तैनात असतानाही वृक्षतोड


सिंधुदुर्गमधील इको सेन्सिटिव्ह गावांच्या संरक्षणासाठी टास्क फोर्स असतानाही वन कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप या तारांकित प्रश्नात करण्यात आला. मात्र वनमंत्र्यांनी त्याचा इन्कार केला.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉरचे संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स कार्यरत आहे. या टास्क फोर्सकडे प्राप्त तक्रारींच्या आधारे आतापर्यंत २ लाख ९१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात आतापर्यंत ८२० वृक्षांची पुनर्लागवड करण्यात आली असून, प्रलंबित राहिलेल्या १३ प्रकरणांमधील वृक्षांची पुनर्लागवड चालू २०२६ च्याच पावसाळ्यात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)