FIFA World Cup 2026 : स्पेनचा उरुग्वेवर १-० असा विजय; उरुग्वे स्पर्धेबाहेर

स्पेनने (Spain) उरुग्वेचा (Uruguay) १-० असा पराभव करत फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2026) स्पर्धेच्या राऊंड ऑफ ३२ (Round of 32) मध्ये धडक मारली. दुसरीकडे, विश्वचषकात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या केप व्हर्डेने (Cape Verde) इतिहास रचत बाद फेरीसाठी (Knockout Stage) पात्रता मिळवली.


स्पेनने ग्रुप एच (Group H) मधील अखेरच्या सामन्यात उरुग्वेवर १-० असा निसटता विजय मिळवला. या पराभवासह दोन वेळच्या विश्वविजेत्या उरुग्वेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उरुग्वेला तीनही साखळी (Group Stage) सामन्यांत एकही विजय मिळवता आला नाही.



सामन्याच्या ४२व्या मिनिटाला अॅलेक्स बाएना (Alex Baena) याने केलेला गोल निर्णायक ठरला. उरुग्वेचा अनुभवी गोलरक्षक फर्नांडो मुस्लेरा (Fernando Muslera) याच्या चुकीचा स्पेनने पुरेपूर फायदा घेतला. बाएनाचा फटका अडवण्यात मुस्लेराला अपयश आल्याने चेंडू थेट जाळ्यात (Net) गेला.


या विजयासह स्पेनने सात गुणांसह ग्रुप एचमध्ये अव्वल स्थान पटकावले. आता स्पेनचा सामना ग्रुप जे (Group J) मधील उपविजेत्या संघाशी, म्हणजे ऑस्ट्रिया (Austria) किंवा अल्जेरिया (Algeria) यांच्यापैकी एका संघाविरुद्ध होणार आहे. दरम्यान, सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि केप व्हर्डे (Cape Verde) यांच्यातील सामना गोलशून्य (Goalless Draw) बरोबरीत संपला. मात्र या एका गुणामुळे विश्वचषकात पदार्पण (Debut) करणाऱ्या केप व्हर्डेने इतिहास रचत बाद फेरीत प्रवेश केला.

Comments
Add Comment

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.