मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान उंदीर मारण्यासाठी विषारी गोळ्या वाटल्याप्रकरणी भायखळा पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी संशयिताकडून एकूण १४,९०० (14,900) विषारी गोळ्या जप्त केल्या आहेत. या घटनेमागे एक मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.



मोहरमच्या दिवशी चार जणांना कॅप्सूल वाटत असताना भायखळा पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. पोलीस उपआयुक्त जयंत मीना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मिरवणुकीदरम्यान आरोपी परवानगीशिवाय कॅप्सूल वाटत असल्याचे पाहून पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त केल्या. या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड (Zinc phosphide)असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.




कॅप्सुलमुळे एका व्यक्तीची प्रकृती बिघडली


या कॅप्सूलचे सेवन केलेल्या एका व्यक्तीची प्रकृती खालावली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी संशयिताकडून १४,९०० कॅप्सूल जप्त केल्या. तपासात असेही उघड झाले की, त्याने ३०,००० रिकाम्या कॅप्सूल आणि ५० किलो फॉस्फरसची मागणी केली होती.आरोपी हा बीबीए पदवीधर असून त्याचा पेंन्ट व्यवसाय आहे. आरोपीने या आधी इराक देशाचा दौरा केल्याचा पोलीस तपासातून समोर आले आहे. दरम्यान,आरोपीचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध आहे का, तसेच मोठा घातपात घडवून आणण्याचा त्याचा उद्देश होता का, याचा सर्व बाजूंनी तपास भायखळा पोलीस करत आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणामागील नेमका हेतू स्पष्ट झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)