मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या संख्यात भर करण्यात आली आहे. जूनच्या २९ तारखेपासून १२ नवीन एसी लोकल या मार्गावरून धावणार आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्निल निला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या बदलामुळे आता मध्ये रेल्वे मार्गावरील एकूण एसी लोकल सेवांची संख्या ९२ वर पोहली आहे. मध्य रेल्वे मार्गावर ८० एसी लोकल धावत आहेत. तर हार्बर मार्गावर २८ एसी सेवा सुरू आहेत.



नवीन एसी लोकलचे वेळापत्रक


या 12 एसी लोकल सोमवार ते शनिवार चालवल्या जातील. या लोकल गाड्या सोमवार पासून शनिवार पर्यंत एसी मार्गावर धावतील. तर रविवार आणि सुट्टीच्या दिवशी या गाड्या नॉन-एसी मार्गावर धावतील.



12 नवीन एसी लोकलचे वेळापत्रक :


1. 96612 TL 12 - टिटवाळा ते CSMT, सकाळी 06:46 ते 08:31

2. 97502 G 2 - घाटकोपर ते CSMT, सकाळी 09:16 ते 09:53

3. 97618 C 18 - कुर्ला ते CSMT, दुपारी 16:34 ते 17:08

4. 97408 T 116 - ठाणे ते CSMT, संध्याकाळी 18:16 ते 19:14

5. 97164 CK 8 - कल्याण ते कुर्ला, रात्री 21:04 ते 22:03

6. 97630 C 30 - कुर्ला ते CSMT, रात्री 22:22 ते 22:53



डाऊन दिशेकडे :


1. 96603 TTL 1 - ठाणे ते टिटवाळा, सकाळी 05:35 ते 06:23

2. 97501 G 1 - CSMT ते घाटकोपर, सकाळी 08:37 ते 09:12

3. 97615 C 15 - CSMT ते कुर्ला, सकाळी 10:00 ते 10:28

4. 97389 T 89 - CSMT ते ठाणे, संध्याकाळी 17:12 ते 18:08

5. 97157 K 115 - CSMT ते कल्याण, संध्याकाळी 19:18 ते 20:49

6. 97433 T 133 - CSMT ते ठाणे, रात्री 23:00 ते 23:57


सध्या मध्ये रेल्वे मार्गावर आणि हार्बर मार्गावर एसी गाड्यांना प्रवाशांचा चांगली प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. तसेच मध्ये रेल्वे मार्गावर एसी गाड्यांची मागणी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे,असे रेल्वे प्रशासनाने सांगीतले आहे.

Comments
Add Comment

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)

Devendra Fadnavis : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत, सर्व प्रकारची कारवाई थांबवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी विविध