Chalisgaon Crime : चाळीसगावात 80 गुन्हेगारांची झाडाझडती; तलवार, चॉपरसह 39 लाखांची वाहने जप्त

Chalisgaon Crime : गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. चाळीसगावात पोलीसांनी आज बुधवारी भल्यापहाटेच साखर झोपेत असलेल्या गुन्हेगारांवर झडप घालत त्यांची झाडाझडती घेतली. पहाटे 2 ते 4 या दोन तासात केलेल्या कारवाईत तब्बल 80 गुन्हेगारांची झडती घेतली. त्यात 44 गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे 39 लाखांची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच एक हजार लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली.या कोम्बींग ऑपरेशनम मोहीमेमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.



चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत आज बुधवार 24 रोजी पहाटे 2 ते 4 वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्ड वरील 80 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यापेैकी 44 आरोपी मिळून आल्याने त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.तर आर्म ऍक्ट 4/25 अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत मुंबई पोलीस अधिनियम 124 प्रमाणे व्हॅगनार गाडी क्रमांक एमएच.20 ईजे.4890,ऑडी गाडी क्रमांक एमएच.14 ईपी.7358 व वरना गाडी क्रमांक एमएच.43 एआर.3409 अशी एकूण 39 लाख रुपये किमतीची तीन वाहने ताब्यात घेतली.


यासह 8 जणांवर पकड वॉरंट बजावण्यात आले.तर 3 इसमांना समन्स बजावण्यात आले. प्रोहिबिशन सदराखाली 3 केसेस करून 60 लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच 1000 लिटर कच्चे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. या मोहीमेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, मेहूणबारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील तसेच 5 पोलीस उपनिरीक्षक, 60 पोलिस अमलदार, स्थानिक गुन्हे शाखा पथक व 3 आरसीपी पथक अशांचा सहभाग होता.



विजेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू


दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात एका २३ वर्षीय तरुणाचा विजेच्या सर्व्हिस वायरचा जोरदार शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ जुन रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. लोकेश जडे असे तरुणाचे असून घराच्या वरच्या मजल्यावर जात असताना विजेच्या पोलवरुन (Electric pole) आलेली सर्व्हिस वायर ही कट असल्याने लोकेश याचा त्याठिकाणी स्पर्श झाला. त्यावेळी पाऊस सुरू होता.



वायरचा लोकेश याच्या डाव्या खांद्याला स्पर्श होताच लोकेशला जोरदार विजेचा धक्का बसताच लोकेश थेट जिन्यावरुन खाली कोसळला. त्यातच लोकेश याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी लोकेशचे काका देखील जिन्याजवळ उभे असल्याने ते किरकोळ जखमी झाले. लोकेश यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात (Pachora Rural Hospital) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी लोकेश यास मृत घोषित केले. लोकेश याचे अकस्मात मृत्यूने नातेवाईकांनी घरासमोर तसेच ग्रामीण रुग्णालया समोर एकच आक्रोश केला.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'दहीहंडी'च्या ऑलिम्पिकमधील समावेशासाठी प्रयत्न करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; वरळीत दिमाखात पार पडले 'प्रो-गोविंदा' लीगचे उद्घाटन मुंबई :

Chandrakant Patil : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांत मराठी भाषा विभाग अनिवार्य; NEPच्या प्रभावी अंमलबजावणीचा चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Vaishali Nagwade : अजितदादांच्या स्मृतींना राखी अर्पण; ‘तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू’ - वैशाली नागवडे

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतींना राखी अर्पण करण्याचा

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Dr. Neelam Gorhe : गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; मोक्का दाखल

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या ११ जणांच्या संघटित टोळीविरोधात कोल्हापूर पोलिसांनी