Sanjay Raut : खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून संजय राऊत यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत आणि महिला लोकप्रतिनिधींविषयी वापरण्यात येणाऱ्या कथित आक्षेपार्ह भाषेविरोधात खासदार डॉ. ज्योती सावित्री नग्नाथ वाघमारे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे (NCW) अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

संजय राऊत यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या विविध वक्तव्यांची आणि सार्वजनिक वर्तनाची गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरोधात तातडीने चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भातील सविस्तर तक्रार त्यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या मुख्य कार्यालयाला ई-मेलद्वारे पाठवली आहे.

महिला लोकप्रतिनिधींचा कथित अवमान, सार्वजनिक जीवनातील आक्षेपार्ह भाषा आणि समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता यांचा उल्लेख करत या प्रकरणात महिला आयोगाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.


महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे काम सुरु; निवेदनात घणाघात


राष्ट्रीय महिला आयोगाच्या माननीय अध्यक्षांना पाठवलेल्या या अधिकृत ईमेलमध्ये खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांच्या जाहीर विधानांचा खरपूस समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला सुसंस्कृत आणि वैचारिक राजकारणाची मोठी परंपरा आहे, मात्र खासदार राऊत यांच्या अत्यंत खालच्या पातळीवरील वक्तव्यांमुळे या परंपरेला मोठी ठेस पोहोचत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


महिला लोकप्रतिनिधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्यांचा आरोप


राजकीय मतभेद आणि टीकेच्या पलीकडे जाऊन खासदार संजय राऊत यांनी सार्वजनिक वक्तव्यांमध्ये सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना पक्षाच्या महिला लोकप्रतिनिधींविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्दांचा वापर केल्याने महिला सन्मानाला धक्का पोहोचल्याचे खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी म्हटले आहे. तसेच, एका महिला कार्यकर्त्याशी झालेल्या कथित दूरध्वनी संभाषणातील शिवीगाळ आणि धमक्यांची ऑडिओ क्लिपही राज्यभर चर्चेचा विषय ठरल्याचा उल्लेख त्यांनी केला.

चिथावणीखोर आणि आक्रमक भाषेचा वापर


सार्वजनिक कार्यक्रम, पत्रकार परिषद आणि माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांविषयी अपमानास्पद उल्लेख करणे, तसेच आक्रमक आणि चिथावणीखोर भाषा वापरणे हे लोकशाही मूल्यांना धरून नसल्याची टीका करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक संवादाची पातळी खालावत असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरसमज


अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार असला तरी त्याचा वापर इतरांचा अपमान करण्यासाठी किंवा अश्लील भाषेचे समर्थन करण्यासाठी होऊ शकत नाही, असे खासदार वाघमारे यांनी नमूद केले. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी आपल्या भाषेवर आणि वर्तनावर संयम ठेवणे अपेक्षित असून, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नसल्याचा संदेश अशा प्रकरणांतून जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

तत्काळ फौजदारी कारवाईची मागणी


खासदार संजय राऊत यांच्या या मानसिक आणि शाब्दिक छळामुळे महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते, अशी भीतीही खासदार वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे स्वतःहून दखल घ्यावी आणि संजय राऊत यांच्यावर योग्य कलमांखाली तत्काळ गुन्हा दाखल करून कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी केली आहे.
Comments
Add Comment

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Tarun Tejpal : शरण या, तुरुंगात जा आणि शिक्षा भोगायला सुरुवात करा; नंतर...

नवी दिल्ली :  'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्कार प्रकरणी

Nashik Simhastha Kumbhmela : ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’, २८ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; प्रवेश विनामूल्य

Nashik Simhastha Kumbhmela : नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांसाठी ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ची भक्ती आणि