Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत उभारण्यासाठी सर्वसमावेशक आणि परिपूर्ण प्रस्ताव तयार करून तो १५ दिवसांच्या आत शासनाकडे सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रस्ताव प्राप्त होताच आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. Nitesh Rane



प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत महाड येथे मच्छी मार्केट उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकल्पाच्या विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


महाड नगरपरिषदेकडून मच्छी मार्केट उभारणीसाठी करण्यात आलेल्या प्राथमिक कामांचा आढावा घेताना मंत्री राणे यांनी हा प्रकल्प स्थानिक मत्स्यव्यवसायाला चालना देणारा ठरणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पामुळे मच्छी विक्रेते, मत्स्यव्यावसायिक आणि ग्राहकांना आधुनिक, स्वच्छ व सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील. तसेच मत्स्य उत्पादनांच्या विक्रीसाठी अधिक सक्षम व नियोजनबद्ध व्यवस्था निर्माण होईल, असे त्यांनी नमूद केले.



बैठकीस आमदार प्रवीण दरेकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त पी. प्रदीप, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Comments
Add Comment

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग