Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


मुंबई, दि. २५ जून २०२६ : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सातत्याने होणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे आणि वापरल्या जाणाऱ्या भाषेमुळे महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करत शिवसेना महिला सेनेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai Police Commissioner) निवेदन सादर केले आहे. लोकप्रतिनिधी, महिला आणि विविध घटकांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या तसेच सार्वजनिकरीत्या धमकीची भाषा वापरणाऱ्या खासदार राऊत यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिला सेनेकडून करण्यात आली.


यावेळी महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी जबाबदारीचे भान ठेवून वक्तव्य करणे अपेक्षित असते. मात्र, वारंवार वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तातडीने योग्य ती कारवाई करावी.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">State Schools : राज्यातील शाळांमध्ये मूलभूत सुविधांसाठी ६ महिन्यांची मुदत : डॉ. पंकज भोयर

मुंबई : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज जोडणी आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन ...


तसेच, मागणीची दखल घेऊन कारवाई करण्यात आली नाही, तर शिवसेना महिला सेना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.पर्यायी हेडिंग:
"संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात शिवसेना महिला सेना आक्रमक; पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी"


शिवसेना महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यात शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, राष्ट्रीय सचिव शायना एन सी, उपनेत्या व बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वास राव, उपनेत्या सुवर्णा करंजे, कला शिंदे, मुंबई मनपा विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी तसेच अनेक आजी माजी नगरसेविका, सर्व महिला विभागप्रमुख इ. उपस्थित होत्या. शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या उबाठाच्या सर्व खासदारांना उद्देशून खासदार राऊत यांनी जाहीर शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून राऊत यांनी विकृतीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, अशी टीका म्हात्रे यांनी केली.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">State Schools : राज्यातील शाळांमध्ये मूलभूत सुविधांसाठी ६ महिन्यांची मुदत : डॉ. पंकज भोयर

मुंबई : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज जोडणी आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन ...


राऊत यांनी महिलेला फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ऑडिओ महाराष्ट्राने ऐकली आहे. महिलांविषयी आकस आणि सूडबुद्धीने राऊत सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कितीही शिवीगाळ केली तर आपले कोणीही, काही करु शकत नाही, असा त्यांचा समज झाला असून ते कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९, १९६, ३५१, ३५२, ३५३, ३५६ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि राऊत यांना अटक करावी, अशी लेखी मागणी शिवसेना महिला सेनेकडून पोलीस आयुक्तांकडे केल्याचे म्हात्रे म्हणाल्या.


त्या पुढे म्हणाल्या की, नुकताच समाज माध्यमांवर राऊत यांनी बंदुकीसोबत फोटो पोस्ट केला होता. राऊत यांच्याकडे शस्त्रे आहेत का? ते समाज माध्यमांवर फोटो पोस्ट करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? याची पोलीसांनी चौकशी करावी. राऊत लोकप्रतिनिधींना आईबहिणीवरुन शिवीगाळ करतात, माध्यमांच्या माइकवर थुंकतात, खासदारांचा अर्वाच्च भाषेत उल्लेख करतात, माता भगिनींना रक्तावरुन बोलतात आणि अवमान करतात. अशा विकृत लोकांना वेळीच चाप बसावा, यासाठी आज महिला सेनेने निवेदन दिले. राऊत यांना अटक केल्यानंतर ठाण्यातील मनोरुग्णालयात पाठवावे, शिवसेनेकडून राऊत यांच्यासाठी मनोरुग्णालयातील एक खाट राखून ठेवल्याचा टोला म्हात्रे यांनी लगावला.


राऊत यांनी उबाठा पक्ष संपण्याची सुपारी घेतल्याची टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील महिलांचा यापुढे अवमान केल्यास शिवसेना महिला सेना त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


Tags
शिवसेनाsanjay rautMumbai Police Commissionerमुंबई पोलीस आयुक्तखासदार संजय राऊत

Comments
Add Comment

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली

NIA Raid : देशविरोधी सायबर हल्ल्याचे धागेधोरे थेट महाराष्ट्रात! NIA ची जुन्नरमध्ये मोठी कारवाई; 'ती' माहिती समोर येताच खळबळ

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Jalgaon : जळगाव-ममुराबाद मार्गावर भीषण अपघात, कावड यात्रेतील १० वर्षीय मुलाचा मृत्यू ; संतप्त जमावाने वाहन पेटवले

Jalgaon Accident News : जळगाव तालुक्यातील जळगाव–ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण