Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन?


पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death) प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक संशयास्पद तपशील समोर येत आहेत. (Pune Police)

पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांचा एका कॅफेमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ १७ जूनचा असल्याचे सांगितले जात असून, दोघेही पुण्यातील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये जवळपास एक तास एकत्र बसल्याचे दिसून आले आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचारच्या सुमारास कॅफेमध्ये आलेले सिया आणि चेतन सुमारे एक तास चर्चा करत होते. या चर्चेदरम्यान केतनच्या हत्येच्या कथित कटावर चर्चा झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच घटनेनंतर पुढे काय करायचे यावरही दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया गोयलने घटनेपूर्वी यूट्यूबवर लोहगड किल्ल्याचे अनेक व्हिडिओ शोधले होते. तिने ही माहिती चेतन चौधरीला दिल्याचा संशय व्यक्त केला जात असून, हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो, अशी शक्यता तपास यंत्रणा तपासत आहे.

या प्रकरणात पोलिसांनी केवळ सीसीटीव्ही फुटेजच नव्हे तर मोबाईल फोन, चॅट रेकॉर्ड, कॉल डिटेल्स, इंटरनेट सर्च हिस्ट्री आणि आरोपींमधील संवाद यांचाही बारकाईने तपास सुरू केला आहे. डिजिटल पुरावे या तपासातील महत्त्वाचा दुवा ठरत आहेत.


दरम्यान, तपासात असेही समोर आले आहे की, २६ वर्षीय केतन अग्रवालने सिया गोयलच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये ४० ते ५० खोल्यांचे बुकिंग केले होते. वाढदिवसाचा मोठा सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाने अधिकच धक्कादायक स्वरूप धारण केले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

 

 
Comments
Add Comment

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली

NIA Raid : देशविरोधी सायबर हल्ल्याचे धागेधोरे थेट महाराष्ट्रात! NIA ची जुन्नरमध्ये मोठी कारवाई; 'ती' माहिती समोर येताच खळबळ

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Jalgaon : जळगाव-ममुराबाद मार्गावर भीषण अपघात, कावड यात्रेतील १० वर्षीय मुलाचा मृत्यू ; संतप्त जमावाने वाहन पेटवले

Jalgaon Accident News : जळगाव तालुक्यातील जळगाव–ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण

Maharashtra Farmers : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! देशी बैलजोडी खरेदीसाठी मिळणार १.२६ लाखांपर्यंत अनुदान; असा करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी देशी बैलजोडी