Actor Pankaj jha : फुलेराच्या आमदारजींचा साधेपणा होतोय व्हायरल; व्हायरल फोटोवर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया

मुंबई : लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'मधील आमदारजींची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले अभिनेते पंकज झा (Actor Pankaj jha) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी ते कोणत्याही नव्या एपिसोडमुळे नव्हे, तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका साध्या पण मजेशीर फोटोमुळे चर्चेचा विषय ठरले आहेत.


पंकज झा (Actor Pankaj jha) यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते बनियन घालून एका बाजारात निवांतपणे बसलेले दिसत आहेत. समोर भाजी विक्रेत्याच्या टोपल्यांमध्ये ठेवलेले टमाटे आणि काकडी पाहत ते काळजीपूर्वक भाजी निवडताना दिसत आहेत. त्यांच्या या साध्या अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.



'आमदारजी' काकडी निवडताना पाहून चाहते खुश :


फोटोमध्ये पंकज झा (Actor Pankaj jha) एका भाजी विक्रेत्याजवळ बसून काकडी आणि टमाट्यांची निवड करताना दिसतात. त्यांच्या शेजारी आणखी एक व्यक्ती बसलेली असून परिसरातील काही लोक त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहताना दिसत आहेत. मालिकेत दबदबा असलेला आमदार प्रत्यक्ष आयुष्यात इतक्या साधेपणाने बाजारात फिरताना पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे 'पंचायत' मालिकेत ग्रामपंचायतीच्या राजकारणावरून आमदारजी आणि प्रधानजी यांच्यातील संघर्ष प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यामुळे हा फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी त्याला मालिकेशी जोडत भन्नाट कमेंट्स करण्यास सुरुवात केली.



सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया :


फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. एका युजरने लिहिले, "विधायकी गेल्यानंतर आमदारजींची नवी इनिंग!" तर दुसऱ्याने मिश्कील टिप्पणी करत म्हटले, "प्रधानजींशी पंगा घेतल्याचा परिणाम दिसतोय." काहींनी "आमदारजी कटहल शोधतायत", "काकडीमध्ये दुधी शोधतायत का?" अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. तर एका चाहत्याने "गाली नाही तर गझल ऐकणार का?" हा मालिकेतील लोकप्रिय संवाद आठवून कमेंट केली. त्यामुळे हा फोटो आणि त्यावरील प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. (Actor Pankaj jha)



'पंचायत ५'ची उत्सुकता शिगेला :


दरम्यान, 'पंचायत'च्या पुढील सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेच्या चौथ्या सीझननंतर आता 'पंचायत ५'बाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अद्याप नवीन सीझनची अधिकृत रिलीज तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने २०२६ मध्येच पाचवा सीझन प्रदर्शित होणार असल्याचे संकेत दिले आहेत. २०२० मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने ग्रामीण भारतातील वास्तव, राजकारण, नातेसंबंध आणि विनोद यांचे अनोखे मिश्रण प्रेक्षकांसमोर मांडले. त्यामुळे प्रत्येक नव्या सीझनसह या मालिकेची लोकप्रियता वाढतच गेली आहे. आता पंकज झा (Actor Pankaj jha) यांचा हा व्हायरल फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची 'आमदारजी' पुन्हा एकदा फुलेरा गावात कधी दिसणार याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.




Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत