Nashik : गोकुळ गितेंच्या विजयात चोरट्यांनाही डाव साधला; ७ लाखांचे दागिने चोरी

Nashik : विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार गोकुळ गिते (Gokul Gite) यांच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत दोन जणांच्या गळ्यातील सुमारे सात लाख रुपये किमतीच्या सोनसाखळ्या लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना म्हसरूळ परिसरातील निसर्गनगर येथे सोमवारी दुपारी घडली. यामुळे विजयी मिरवणुकीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



नेमकं काय घडलं ?


एकीकडे विधान परिषद निवडणुकीचा (Legislative Council Election) निकाल जाहीर झाल्यानंतरचा विजयाचा जल्लोष होता तर दुसरीकडे अपयश पदरी पडल्याने निराशाजनक वातावरण. अशातच चोरट्यांनीही गर्दीत हात धुवून घेतले. आमदार गोकुळ गीते यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी निसर्गनगर परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक सहभागी झाले होते.


येवला तालुक्यातील नगरसूल (Nagarsul) येथील ठेकेदार शुभम अशोक पाटील आणि मनोज उत्तमराव इघे हेदेखील मिरवणुकीत सहभागी झाले होते. विजयी मिरवणुकीत जल्लोष होता, घोषणाबाजी होती आणि मोठ्या प्रमाणात गर्दीही. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी या दोघांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्यांवर डल्ला मारला. शुभम पाटील यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची, तर मनोज इघे यांच्या गळ्यातील ३३ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्यांनी हातचलाखीने लंपास केली.



७ लाखांचे दागिने चोरी


कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि ढोल-ताशांच्या गजरात अचानक झालेल्या ढकलाढकलीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दोघांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्यांवर डल्ला मारला. शुभम पाटील यांची १५०,००० रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन. तर मनोज दिघे यांची ५४५,००० रुपये किमतीची ३३ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरीला गेली. काही वेळानंतर गळ्यातील चैन चोरीला गेल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी तातडीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवण्यात आली.


घटनेनंतर शुभम पाटील यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात (Mhasrul Police Station) तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार जगताप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. राजकीय मिरवणुका, धार्मिक उत्सव आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे.


दरम्यान, पोलिसांनी (Police) अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हवालदार जगताप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. विजयोत्सवाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग