Nashik Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

Nashik Shalarth ID Scam : राज्यातील शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात काही संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. जवळपास ९०० संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या या प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण राज्यभर पसरली आहे.


दरम्यान आता याच नाशिक शालार्थ आयडी घोटाळ्याच्या (Nashik Shalarth ID Scam ) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकाच जावक ((Outward)) क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे या तपासात उघड झाले आहे.



लवकरच मोठी कारवाई ?


नाशिक शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासादरम्यान उपलब्ध कागदपत्रांमध्ये विरोधाभास दिसून आला. त्यामुळे आता अधिकृत नोंदींमध्ये फेरफार झाल्याचा संशय आणखी बळावला आहे. धक्कादायक म्हणजे, एकाच अधिकृत आदेशाखाली भिन्न नावांचे संच नोंदविण्यात आल्याचे दिसून आले आहे. सरकार पक्षाच्या वतीने ही बाब न्यायालयात स्पष्ट करण्यात आली. त्या अनुषंगाने सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके (Assistant Commissioner of Police Sandeep Mitke) तपास करीत असून या प्रकरणात लवकरच मोठी कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.



प्रशासकीय प्रक्रियेच्या पारदर्शकतेतर प्रश्नचिन्ह 


राज्य शिक्षण मंडळाचा शालार्थ आयडी घोटाळा तत्कालीन अध्यक्ष नितीन उपासनी (Nitin Upasani), तत्कालीन शिक्षणाधिकारी संशयित नितीन बच्छाव (Nitin Bachhav), भाऊसाहेब चव्हाण (Bhausaheb Chavan) यांच्यासह संशयितांचा समावेश आहे. बोगस शालार्थ आयडी कोणाच्या मंजुरीने तयार झाले, याचा तपास पहिल्या टप्प्यात झाला असला तरी या प्रकरणात अजून काही संशयितांची चौकशी केली जाण्याची शक्यता पोलिस सत्रांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे प्रशासकीय प्रक्रियेच्या पारदर्शकतेतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असन संबंधित जबाबदारांवर कारवाईची मागणी होत आहे.



उपासनी याचा जामीन अर्ज फेटाळला


शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याचा जामीन अर्ज नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Nashik Road Additional Sessions Court) फेटाळला आहे. हा प्रकार संघटित व्हाइट कॉलर गुन्हेगारी (White-collar crime) असल्याचे निरीक्षण नोंदवीत न्यायालयाने उपासनीला जामीन देण्यास नकार दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी हा जामीन अर्ज फेटाळला आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Road Police Station) मार्च महिन्यात शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी फसवणुकीसह कारस्थान आणि संघटित गुन्हेगारीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी