Ketan Agrawal Death : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; अन् 'तीच' निघाली मार्स्टरमाईंड

होणाऱ्या बायकोचा 'खतरनाक' डाव! बड्या बापाच्या मुलाला ढकललं दरीत


पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात असलेल्या लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) ट्रेकिंगदरम्यान मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू (Accidental Death) असल्याचे मानले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात काही संशयास्पद बाबी समोर आल्याने हा मृत्यू अपघात नसून हत्येचा भाग असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे.

 

ट्रेकिंगला गेला अन् आयुष्याचा धागा तुटला 


केतन अग्रवाल हा एका व्यावसायिक कुटुंबातील तरुण होता. त्याचे लवकरच लग्न होणार होते. लग्नाच्या तयारीला वेग आला असतानाच होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तो तिच्यासोबत लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. याच दरम्यान तो सुमारे 400 फूट खोल दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. (Ketan Agrawal Death)

 

पोलिसांकडून तपास सुरु 


घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. केतन नेमका कसा पडला आणि त्या वेळी परिसरात आणखी कोण उपस्थित होते, याचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक संशयित तरुण हुडी घालून, चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत परिसरात फिरताना दिसल्याची माहिती समोर आली आहे. (Lohagad Fort Murder Mystery)

 

तपासात धक्कादायक माहिती समोर 


यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा आणि इतर पुरावे तपासण्यात आले. या तपासातून काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, केतनच्या मृत्यूमागे पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता तपासली जात आहे. या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या एका मित्राचीही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

सध्या पोलिसांकडून सर्व पुरावे तपासले जात असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच केतन अग्रवालच्या मृत्यूमागील सत्य समोर येणार आहे. (Maharashtra Crime)

 
Comments
Add Comment

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Eknath Shinde : पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना

पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर

Vaidyanath Temple : वैद्यनाथ मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवरासाठी चोख बंदोबस्त

बीड : पवित्र श्रावण महिना सुरू असून, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.