FIFA World Cup 2026 Lionel Messi : पेनल्टी हुकली, पण विक्रम गाठला! मेस्सीच्या दोन गोलसह अर्जेंटिनाचा विजय

Lionel Messi : 'फुटबॉलचा महानायक' GOAT लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने पुन्हा एकदा आपल्या शानदार खेळाची झलक दाखवत अर्जेंटिनाला FIFA World Cup 2026 च्या बाद फेरीत पोहोचवले. ऑस्ट्रियाविरुद्धच्या गट 'J' सामन्यात अर्जेंटिनाने २-० असा विजय मिळवला.

सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला मेस्सीने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुखापत वेळेत (Stoppage Time) दुसरा गोल झळकावत त्याने अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, सामन्यात मेस्सीला मिळालेली पेनल्टी (Penalty) तो गोलमध्ये (Goal) रूपांतरित करू शकला नाही. मात्र त्याचा संघाच्या विजयावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.



या दोन गोलांच्या जोरावर लिओनेल मेस्सीने FIFA World Cup इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला. त्याने जर्मनीचा माजी स्टार स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोझे याचा विक्रम मोडीत काढत इतिहास रचला. मेस्सीच्या दमदार कामगिरीमुळे अर्जेंटिनाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले असून, विश्वचषक जिंकण्याच्या त्यांच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.
Comments
Add Comment

BWF World Championship : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक

नवी दिल्ली : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला जोडीला जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत सारंश जैनला टीम इंडियाकडून पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून कोलंबो येथे

Women's Hockey World Cup : भारतीय महिला हॉकी संघाचा नेदरलँड्सकडून पराभव, उपांत्य फेरीच्या आशांना धक्का

ॲमस्टेलवीन : महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत, भारतीय महिला हॉकी संघाला गतविजेत्या ऑलिम्पिक आणि

IND vs SL 2nd Test : कुलदीप यादवला डच्चू? एका खेळाडूचे पदार्पण; श्रीलंकेविरुद्ध अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

IND vs SL 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने १६५ धावांनी शानदार विजय मिळवत दोन सामन्यांच्या

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Neeraj Chopra : लुसाने डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचा सीझनमधील सर्वोत्तम थ्रो; अवघ्या ९ सेंटीमीटरने हुकलं सुवर्णपदक

नवी मुंबई : भारताचा स्टार भालाफेकपटू आणि ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने लुसाने डायमंड लीगमध्ये (Lausanne Diamond League)