Vaibhav Suryavanshi : स्वप्न साकारलं! टीम इंडियाची जर्सी हातात घेताच वैभव सूर्यवंशी भावूक; म्हणाला...

मुंबई : अवघ्या १५ वर्षांच्या वयात आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करून क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशीसाठी (Vaibhav Suryavanshi) आयुष्यातील सर्वात मोठा क्षण अखेर आला आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या या युवा फलंदाजाला टीम इंडियाची अधिकृत जर्सी मिळाली आणि त्या क्षणी तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या खास क्षणाचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.



'प्लेयर नंबर ५३२'ची खास एंट्री :


भारतीय संघाचे थ्रो-डाउन स्पेशालिस्ट रघू यांनी वैभवची जर्सी त्याच्या हॉटेल रूमपर्यंत पोहोचवली. खोलीच्या दरवाजावर 'प्लेयर नंबर ५३२' असा उल्लेख करण्यात आला होता. दार उघडताच वैभवने (Vaibhav Suryavanshi) रघू यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर जर्सी हातात घेताच त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांतील भावनांचा पूर लपवता आला नाही.



"हे स्वप्न पूर्ण झालं" :


जर्सी मिळाल्यानंतर वैभवने (Vaibhav Suryavanshi) आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "माझ्याकडे शब्दच नाहीत. ज्या स्वप्नासाठी मी पहिल्यांदा हातात बॅट घेतली, मैदानावर घाम गाळला, कठोर सराव केला, ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे. टीम इंडियाची जर्सी घालण्याची प्रक्रिया आज पूर्णत्वास गेली आहे. हा क्षण शब्दांत मांडणं माझ्यासाठी खूप कठीण आहे."



"स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं" :


वैभव पुढे म्हणाला, "मला खरंच स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. मी इतका आनंदी होतो की चेहऱ्यावरचं हसू थांबत नव्हतं. काही गोष्टी आयुष्यात अनपेक्षितपणे घडतात आणि त्या क्षणी काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचत नाही. जर्सी पाहिल्यानंतर माझीही तशीच अवस्था झाली होती." (Vaibhav Suryavanshi)



आयपीएलमध्ये केला होता विक्रमांचा पाऊस :


वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल हंगामात तुफानी फलंदाजी करत तब्बल ७७६ धावा केल्या आणि 'ऑरेंज कॅप'वर कब्जा केला. या दरम्यान त्याने तब्बल ७२ षटकार ठोकत विक्रमांची मालिका रचली. एका आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा ५९ षटकारांचा विक्रमही त्याने मोडीत काढला. आता देशांतर्गत आणि आयपीएल क्रिकेट गाजवल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मोठी छाप पाडण्याची संधी त्याच्यासमोर आहे.


भारतीय क्रिकेटला मिळालेल्या या नव्या ताऱ्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या असून, 'प्लेयर नंबर ५३२' आता टीम इंडियासाठी कोणते नवे विक्रम रचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vaibhav Suryavanshi)




Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)