Nashik TCS Case : निदा खानच्या वैद्यकीय तपासणीचे न्यायालयाचे आदेश

Nashik TCS Case : नाशिकच्या TCS कंपनीत कार्यरत असलेल्या तरुणीवरील कथित बलात्कार, धर्मांतराचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल गुन्ह्याच्या तपासात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयितांपैकी एक असलेल्या निदा खान हिची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Nashik Road Additional Sessions Court) दिले आहेत. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) दाखल असलेल्या या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी २२ जुलै ही तारीख निश्चित केली असून, संशयितांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारी (दि. २५) होणार आहे.



या प्रकरणातील पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान (Nida Khan) यांनी तिच्यावर विविध प्रकारे अत्याचार केल्याचा आरोप आहे. यामध्ये बलात्कार, धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. या आरोपांमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.


दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासाची व्याप्ती वाढवत फरार असलेल्या निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या काही व्यक्तींनाही गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाचे राजकीय आणि सामाजिक पडसादही उमटत आहेत.



बचाव पक्षाची न्यायालयात महत्त्वाची बाजू


सुनावणीदरम्यान निदा खानतर्फे अॅड. प्रतीक ताजनपुरे यांनी न्यायालयात वकीलपत्र सादर केले. यावेळी त्यांनी मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून निदा खानचा वैद्यकीय अहवाल मागविण्याची विनंती केली. न्यायालयाने या मागणीची दखल घेत अर्ज मंजूर केला आणि कारागृह प्रशासन तसेच पोलिसांना तिची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. बचाव पक्षाने न्यायालयासमोर मांडलेल्या माहितीनुसार, निदा खान सध्या गर्भवती आहे. तिच्या शरीरातील लोहाचे प्रमाण अत्यंत कमी असून, कारागृहातील दैनंदिन कामांमुळे तिच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या वैद्यकीय तपासणीत तिच्यासह गर्भातील बाळाची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे निदर्शनास आल्याचे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.



वैद्यकीय अहवालाकडे सर्वांचे लक्ष


न्यायालयाच्या आदेशानंतर आता निदा खानच्या वैद्यकीय तपासणी अहवालाकडे (Medical Report) सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालाच्या आधारे तिच्या आरोग्याविषयीची वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यानही या अहवालाचा महत्त्वाचा आधार घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, बलात्कार, धर्मांतराचा प्रयत्न आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल या गाजलेल्या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील सुनावणीत न्यायालयासमोर आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे २५ जून रोजी होणारी जामीन अर्जावरील सुनावणी आणि त्यानंतरचा न्यायालयीन निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Chiplun Crime : सकाळी लवकर उठ म्हणताच सुनेचा संताप! सासूला बेदम मारहाण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शेतात

Chembur News: चेंबूर वृक्ष दुर्घटनेनंतर महापालिकेचा मोठा निर्णय; कंत्राटदारांना दंड, झाडांच्या सुरक्षेसाठी नवी SOP लागू होणार

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी

Delhi Riots : आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवक ताहिर हुसेन दोषी

नवी दिल्ली: २०२० च्या ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान गुप्तचर विभागातील (IB) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी

Jalgaon Accident : संसाराची नवी स्वप्न धुळीस! लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

माहेरी जाताना २१ वर्षीय नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरात सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात

IND(w) vs ENG(w) : ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात भारताच्या 'रन'रागिणींचा महा-पराक्रम; इंग्लंडवर २७० धावांनी दणदणीत विजय

लंडन: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने नवा इतिहास

Accident : व्हिएतनाम बोट दुर्घटना; १५ भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज रात्री मुंबईत दाखल होणार

मुंबई: व्हिएतनाममधील फूक्वॉक बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट अपघातात जीव गमावलेल्या १५ भारतीय पर्यटकांचे