Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या


Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला आरोपींनी लक्ष्य करत जीवघेणा हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार, विलास नवनाथ घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज) असे मृत तरुणाचे नाव आहे. विलास आणि त्याचा मित्र आकाश चाळक हे दोघे मिळून टाकळी येथे हॉटेल चालवत होते.



नेमकं काय घडलं?


२० जून रोजी त्यांच्या हॉटेलमध्ये उमेश माने नावाचा व्यक्ती बसला असताना काही जण तेथे आले आणि त्याच्याशी वाद घालू लागले. वैयक्तिक कारणातून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. उमेश माने याला शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला करण्यात आला. परिस्थिती गंभीर होताच उमेश तेथून पळून गेला. त्याला वाचवण्यासाठी आणि वाद शांत करण्यासाठी विलास घुले आणि त्याचे सहकारी पुढे सरसावले.


मात्र, मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलासवरच आरोपींनी हल्ला चढवला. "तू आमच्यामध्ये पडू नको" असे म्हणत आरोपींनी धारदार चाकूने त्याच्या पोटावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या विलासचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. तरुणाचा कोणताही दोष नसताना त्याची हत्या झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी केज शहरात रास्ता रोको आंदोलन केले. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली. विलास याच्या हत्येनंतर केज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.



या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक

11th Admission Special Round : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची विशेष फेरी सुरु; संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार