BMC News : मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात तुंबणाऱ्या पाण्यावर उतारा

हिंदमाता, मिलन सबवेच्या धर्तीवर भूमिगत टाकी बांधून ठाणे खाडीत सोडणार


मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी


मुंबई : मानखुर्द महाराष्ट्रनगर येथील भुयारी मार्गात दर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थतीवर आता उतारा सापडला आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी याठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशन (Mini Pumping Station) उभारले जाणार आहे. तसेच याठिकाणी साचले जाणारे तात्काळ काढण्यासाठी भूमिगत टाकी बनवली जाणार आहे. या टाकीतील पाणी ठाणे खाडीत नेवून सोडण्यासाठी याठिकाणी १२०० मि.मी व्यासाची वाहिनी टाकली जाणार आहे.


मानखुर्द सबवे हा भाग ३१५ कॅचमेंट मधील सर्वात सखोल भाग आहे. या खोलगट भागाचा उतार ठाणे खाडी कडे असून हलक्या पावसाच्या सरींमध्येही मानखुर्द सबवे येथे पावसाचे पाणी साचण्यास सुरवात होते. परिणामी पूर्व पश्चिम वाहतूक बंद होते. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून उप पजवा विभागाच्यावतीने ३ पंप १००० घन मी प्रति तास क्षमतेचे, ४ पंप २४० घन मी प्रति तास क्षमतेचे, आणि ३ पंप २५० घन मी प्रति तास क्षमतेचे दरवर्षी पावसाळा कालावधीत बसविण्यात येतात.



परंतु पंपिंग व्यवस्था ही अपुरी असल्याकारणाने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे या परिस्थितीवर उपायात्मक योजना म्हणून सहाय्यक आयुक्त एम/पूर्व यांनी मिनी पंपिंग स्टेशन स्थापन करण्यासाठीची मागणी केली. त्यानुसार या समस्येवर परिणामकारक उपाय शोधण्यासाठी पजवा विभागातील विविध अभियंत्यांनी स्थळ पाहणी केली. स्थळपाहणी अंती या ठिकाणी पिट ची व्यवस्था करून त्या मधे उच्च क्षमतेचे पंप बसवून, त्या मधील साचलेले पाणी १२०० मी मी व्यासाच्या मृदू पोलादी वाहिनी मधून जवळपास ४३० मी अंतरावर ठाणे खाडीमधे सोडणे असे याबाबत ठरविण्यात आले.


त्या अनुषगाने पजवा विभागातील नियोजन उपविभागाने १०० मी मी प्रति तास क्षमतेच्या पावसाची तीव्रता विचारात घेऊन मानखुर्द सबवे येथे जवळपास १२००० घन मी इतका पाणलोटाचा निचरा तयार होतो.



त्यानुसार पजवा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर भुयारी मार्गामध्ये पाणी साचण्याची समस्या कमी करण्याच्या उद्देशाने नवीन संप पिट बांधून, संप पिट पासून ठाणे खाडी पर्यंत १२०० मी.मी. व्यासाची मृदू पोलादी वाहिनी टाकणे व ३००० घन मी प्रति तास क्षमतेचे ३ उदचंन संच भाडे तत्वावर घेऊन त्याचे पावसाळा कालावधीसाठी पुढील ४ वर्षे म्हणजे सन २०२६ ते सन २०२९ या कालावधीकरता उभारण्यात येणार आहे. यासाठी आता कंत्राटदाराची निवड करण्यात येत आहे. यासाठी १४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी म्हाळसा कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.



अशाप्रकारे केली जाणार उपाययोजना



  • मानखुर्द सबवे येथे पावसाळा कालावधीत साचलेल्या पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा करण्यासाठी १५ मी x ६ मी x २.२६ चे संप पिट करणे.

  • संप पिट पासून ठाणे खाडी १२०० मी.मी. व्यासाची ४३० मी लांबीची मृदू पोलादी वाहिनी टाकणे.

  • मानखुर्द सबवे संप पीट येथे ३००० घन मी प्रति तास क्षमतेचे ३ उदचंन संच भाडे तत्वावर घेऊन त्याचे प्रचलन व परिरक्षण पावसाळा कालावधीसाठी पुढील ४ वर्षे म्हणजे सन २०२६ ते सन २०२९करता भाडेतत्वावर

Comments
Add Comment

Rajawadi Hospital : राजावाडी रुग्णालयात अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर

४६ वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून ५.५ किलो वजनाची काढली गाठ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मानखुर्द येथील ४६

Maharashtra Weather Update : पुढील चार दिवसांसाठी विजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला असून,

BMC News : पदपथांवरील सर्व अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर फिरणार जेसीबी

- कोणतीही अनधिकृत बांधकामे होणार नाहीत अधिकृत - महापालिका आयुक्तांचे सर्व सहायक आयुक्तांना कडक निर्देश मुंबई

BMC News : मुंबईत कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर, कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर,

Kokan Railway : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते सावंतवाडी रोड नवी नियमित एक्स्प्रेसला मंजुरी; लवकरच प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

Health Facilities : स्वातंत्र्यदिनी राज्यभरात विक्रमी संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण

मंत्री प्रकाश आबिटकर; ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार मुंबई : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट