पुनिर्वकास कामासाठी नव्याने नेमला कंत्राटदार
मुंबई (सचिन धानजी)
परळ (Paral) मधील कोविडपूर्वी हाती घेण्यात आलेल्या शिरोडकर मंडईच्या पुनर्विकास प्रकल्प कामांतील कंत्राटदाराने पळ काढल्यानंतर आता येथील प्रकल्पाचे काम अपूर्णच आहे. या अपूर्ण असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाठी आता नव्याने कंत्राटदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. या अर्धवट राहिलेल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी (Redevelopment project) विविध करांसह २९७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि यासाठी कुणाल आणि हिराणी या संयुक्त भागीदार कंपनीची निवड करण्यात आली आहे.
परळ येथील जगन्नाथ भातणकर मार्गावरील महानगर पालिकेच्या मालकीच्या डॉ. शिरोडकर मंडई वसलेल्या भूकर क्र. ९२ व ९४ (भागशः), परळ शिवडी विभाग धारण करणा-या भूखंडाचा पुनर्विकास करुन त्या ठिकाणी महापालिका मंडई आणि कर्मचारी निवासस्थाने बांधण्यासाठी सन २०१८मध्ये कंत्राटदाराची (contractor) निवड करण्यात आली होती. त्यानुसार डिसेंबर २०१८ पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. परंतु सन २०२३ नंतर भूखंडाच्या काही जागेवर पुर्वीच्या बंद करण्यात आलेल्या कंत्राटाअंतर्गत तळ घर आणि तळ मजला तसेच एक ते सहा मजल्याचे बांधकाम केल्यानंतर कंत्राटदाराने पुढील काम करण्यास असमर्थता दर्शवली. आज येथील तळ घरामध्ये मासळी बाजार भरत आहे.
जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला असतानाही महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णता आणि दमट ...
पूर्वी २१ मजल्याचे बांधकाम केले जाणार होते, आता त्यासोबतर ४८ मजल्याची उत्तुंग इमारतही बांधली जाणार आहे. त्यामुळे या अर्धवट राहिलेल्या प्रकल्पातील सद्यस्थितीतील इमारतीमधील उर्वरित कामे पूर्ण करणे व तिचे २१ मजल्यांपर्यंतचे बांधकाम करणे आणि उर्वरित रिकाम्या भुखंडावर जुन्या इमारतीशी संलग्न नवी इमारत तळघरासह ४८ मजल्यांपर्यंत बांधकाम करण्यासाठी नव्याने कंत्राटदार नेमण्यात आला आहे.
यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये तीन कंपन्यांनी भाग घेतला आहे. यामध्ये उणे १५.२९ दराने बोली लावणारी कुणाल-हिराणी ही संयुक्त भागीदारातील कंपनीची निविड करण्यात आली आहे. यामध्ये मूळ कंत्राट २३९.५० कोटी रुपये आणि विविध करांसह २९७.९२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कुणाल स्ट्र्क्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आजवर गांधीनगर, ओडीसा भुवनेश्वर, दमण आदी ठिकाणी कामे केलेली आहे.
मुंबई : लाखो चाकरमान्यांची 'जीवनवाहिनी' असलेली मुंबईची उपनगरीय रेल्वे सध्या अत्यंत गंभीर आणि समाजविघातक कारवायांचे केंद्र बनत असल्याचे धक्कादायक ...
याबाबतचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून समितीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
ए विंग इमारत २१ मजली
प्रकल्पामध्ये निम्न तळ घर + तळ मजला + १ ते ३ मजले मंडईसाठी राखीव
४ ते १० मजले वाहनतळ
११ ते २१ मजले सेवानिवासस्थान
बी विंग
११ ते ४८ मजले सेवानिवासस्थाने
तळघर प्रस्तावित असुन त्याठिकाणी मल-जल प्रक्रिया संयंत्रे, भूमीगत पाण्याची टाकी तसेच पर्जन्य जल पुनर्भरणाच्या टाकीचे बांधकाम ई. सुविधा
अग्निशामक यंत्रणा, दुरध्वनीची व्यवस्था,
सी.सी.टि.व्ही. यंत्रणा, इंटिग्रेटेड बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम (आयबीएमएस), उद्वाहके, विद्युत जनित्र व इतर






