टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल मुग्धा गोडबोले - रानडे मुग्धा गोडबोले-रानडे सध्या अभिनयासोबत लेखनाची बाजू सांभाळत आहे. वीण दोघांतली ही तुटेना, सनई चौघडे, मी जिंकून घेईन सारं या तिन्ही मालिकेचे संवाद लेखन करीत आहे.मुग्धा मूळची पुण्याची. विमलाबाई गरवारे शाळेतून तिचे शिक्षण झाले. शाळेत असताना अभ्यासासोबत तिने सहशालेय कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. तिने वयाच्या पाचव्या वर्षी गोष्ट सांगण्याच्या स्पर्धेत बक्षीस मिळवले होते. तेव्हा ती पहिलीत होती. नाटकात, वक्तृत्व स्पर्धेत तिने भाग घेतला होता, त्यामुळे तिची स्टेजवरील भीती नाहीशी झाली होती. पुढे तिने फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तिने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ‘आम्ही खरंच निष्पाप होतो’ ही एकांकिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने लिहिली होती व बसवली होती. त्या एकांकिकेमध्ये मुग्धाने काम केले. पुढे तिने कामगार कल्याण स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला. परिचय, समन्वय संस्थांमधील नाटकांमध्ये तिने कामे केली. संतोष पवारांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये तिने कामे केली. विजय तेंडुलकरांच्या नाटकातील भूमिकेसाठी तिला विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तिचं ग्रॅज्युएशन झालं त्यावेळी दिग्दर्शक संगीत कुलकर्णी 'थरार' नावाची मालिका करण्यासाठी पुण्याला गेले होते. तेव्हा अल्फा मराठी नवीन चॅनेल आले होते. त्याचे सर्व युनिट शूटिंगसाठी पुण्याला आले होते, जयवंत वाडकर, यतीन कार्येकर आले होते; परंतु मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री आली नव्हती, कोणीतरी मुग्धाचा रेफरन्स त्यांना दिला होता. मुग्धा त्यांना भेटली व त्या मालिकेसाठी तिची निवड झाली. ही मालिका तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली. संपूर्ण युनिट तिच्याशी घरच्याप्रमाणे वागले. तिला कसलाही त्रास झाला नाही. तिने मनोरंजनाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ती मध्यवर्ती भूमिकेत होती. कॅमेरासमोर ती पहिल्यांदाच अभिनय करीत होती. साऱ्यांनी तिला सांभाळून घेतले. थरार मालिकेचे ३ ते ४ भाग झाले होते, एकदा ती आईवडिलांसोबत रात्री आईस्क्रीम खायला गेले असताना तिथे काही जण होते, ते त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही थरार मालिकेत तुम्हांला पाहिले आहे. खूप छान काम झाले आहे. ही प्रेक्षकांची प्रतिक्रिया तिच्यासाठी नवीन होती. प्रेक्षकांना तिचे काम आवडू लागले होते. त्या प्रतिक्रियेने ती सुखावली गेली व तिला तिच्या कामाचा अभिमान वाटला.
‘लँड जिहाद’बाबत मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांच्या पत्रानंतर कारवाई; ओशिवरा सोसायटीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त ज्येष्ठ नागरिक, ...
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई ...






