Nashik : नाशिक जिल्ह्यात १८२ टँकरद्वारे ३.२३ लाख नागरिकांना पाणीपुरवठा

नाशिक : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. १८ जून २०२६ रोजीच्या स्थितीनुसार जिल्ह्यातील १७६ गावे व ४८३ वाड्यांमधील एकूण ३ लाख २३ हजार ७७१ नागरिकांना १८२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असून, पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने विविध पर्यायी स्रोत कार्यान्वित केले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली आहे.



१८२ टँकरच्या दररोज ३८२ फेऱ्या


जिल्ह्यात सध्या १८२ टँकरच्या ३८२ फेऱ्या दररोज करण्यात येत आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठी गावांसाठी 22 व टँकरसाठी 55 अशा एकूण 77 विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी विंधन विहिरी व अन्य जलस्रोतांचाही वापर करण्यात येत आहे.


येवला तालुक्यात 44 टँकर कार्यरत असून त्या माध्यमातून 44 गावे व 70 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात 38 गावे व 192 वाड्यांसाठी 36 टँकर, इगतपुरी तालुक्यात 8 गावे व 42 वाड्यांसाठी 21 टँकर, सिन्नर तालुक्यात 8 गावे व 71 वाड्यांसाठी 18 टँकर आणि सुरगाणा तालुक्यात 15 गावे व 14 वाड्यांसाठी 12 टँकर कार्यरत आहेत.



मालेगाव तालुक्यात 17 गावे व 48 वाड्यांसाठी 17 टँकर, चांदवड तालुक्यात 14 गावे व 8 वाड्यांसाठी 11 टँकर, देवळा तालुक्यात 6 गावे व 10 वाड्यांसाठी 6 टँकर, बागलाण तालुक्यात 2 गावे व 6 वाड्यांसाठी 5 टँकर आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात 4 गावे व 16 वाड्यांसाठी 6 टँकर, पेठ तालुक्यात 6 गावे व 6 वाड्यांसाठी 6 टँकर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.


पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. ज्या भागांमध्ये पाण्याची मागणी वाढत आहे, तेथे अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याबरोबरच नव्या जलस्रोतांचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, नाशिक आणि संबंधित महसूल यंत्रणा यांच्यात समन्वय साधून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.



पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज


नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असून आगामी काळात आवश्यकतेनुसार विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून त्याचे नियोजन ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहेत.


एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी 31 ऑगस्ट अखेर वापरायचे आहे. सर्व धरण समूहात सरासरी एकूण 22 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पिण्याचे पाणी सोडून इतर सिंचन आर्वतन थांबविण्यासाठी पाटबंधारे विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. धरण क्षेत्रातून अनधिकृत पाणी उपसा होत असेल तर प्रतिबंधासाठी पथके नियुक्त करून फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान