S.Shreesanth : गौतम गंभीरवर श्रीशांतची जोरदार टीका; 'त्याचा काही उपयोग नाही, त्याच्या जागी धोनीला प्रशिक्षक बनवा !

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झाला आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस.श्रीशांत (S.Shreesanth ) यांने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर (Gautam Ghambhir) जोरदार टीका केली आहे.त्याने गौतम गंभीरच्या जागी धोनीला प्रशिक्षकपद देण्याची मागणी केली आहे.एका मुलाखतीदरम्यान श्रीसंतने गंभीरबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली असू पुन्हा एकदा गंभीरच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.



संघाला प्रशिक्षक नाही,मार्गदर्शक हवा


श्रीसंतने (S.Shreesanth ) स्पष्ट शब्दांत सांगीतले की, संघाला सध्या प्रशिक्षकपेक्षा अनुभवी मार्गदर्शकाची गरज आहे. गंभीर काहीही कामाचा नाही, त्याच्या जागी धोनी ला भारतीय संघाचे प्रशिक्षकपद देण्यात आले पाहिजे.गंभीर खेळाडूंवर अनावश्यक दबाव निर्माण करतो, असे श्रीसंत म्हणाला.त्याच्या मते, धोनीसारख्या शांत आणि अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली संघ अधिक चांगली कामगिरी करू शकतो.



टी- २० विश्वचषक जिंकण्याचा श्रेय केवळ प्रशिक्षकचा नाही ?


राहुल द्रविड यांच्या कार्यकाळानंतर गौतम गंभीर यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने टी-20 विश्वचषक २०२६ जिंकत मोठे यश मिळवले. मात्र, श्रीसंतने या यशाचे संपूर्ण श्रेय गंभीरला देण्यास नकार दिला. भारत विश्वविजेता झाला, पण त्याचे पूर्ण श्रेय फक्त गंभीर ला देता येणार नाही. कर्णधार आणि संजू सॅमसन यासारख्या खेळांडूनही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.



२०१३ मॅच फिक्सिंगमुळे पुन्हा वाद ?


गौतम गंभीर आणि एस. श्रीसंत यांनी एकत्र भारतासाठी क्रिकेट खेळले असले तरी त्यांच्यातील मतभेद नवे नाहीत. 2013 च्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर गंभीरने अनेकदा सार्वजनिकरित्या श्रीसंतवर टीका केली होती.नंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर श्रीसंतवरील आरोप मागे घेण्यात आले, मात्र त्या प्रकरणामुळे त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला. त्यामुळे दोघांमधील संबंध कधीच पूर्वीसारखे झाले नाहीत.



श्रीसंतची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी


श्रीसंतने भारतासाठी दोन विश्वचषक जिंकले आहेत. तो २०११ मध्ये एकदिवसीय आणि २००७ मध्ये टी- २० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये २७ कसोटी सामन्यात ८७ विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी त्याने ५३ एकदिवसीय सामन्या भाग घेतला आहे.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव