FIFA World Cup 2026 : जोनाथन डेव्हिडची हॅटट्रिक; कॅनडाचा कतारवर दमदार विजय; स्वित्झर्लंडचीही दमदार कामगिरी

व्हँकुव्हर : फिफा विश्वचषक 2026 मध्ये यजमान कॅनडाने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत त्यांनी आपला पहिला विजय नोंदवला आहे.व्हँकुव्हर येथील बीसी प्लेस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कॅनडाने कतारवर 6-0 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत गुण तालिकेत अव्वल क्रमांक पटकावला. कॅनडाचा स्टार खेळाडू जोनाथन डेव्हिड याने या सामन्यात दमदार कामगिरी करत विश्वचषकातील आपली पहिली हॅटट्रिक केली.(Abhijit Bangar)




 

जोनाथन डेव्हिडची ऐतिहासिक कामगिरी


26 वर्षीय डेव्हिडने 29व्या, अतिरिक्त वेळेतील तिसऱ्या आणि सामन्याच्या अखेरच्या क्षणी गोल करत हॅटट्रिक पूर्ण केली. यासह तो फिफा विश्वचषकात हॅटट्रिक करणारा पहिला कॅनेडियन फुटबॉलपटू ठरला. विशेष म्हणजे, या विश्वचषकातील ही दुसरी हॅटट्रिक असून याआधी लिओनेल मेस्सीने हा पराक्रम केला होता. यामुळे सध्या जोनाथन डेव्हिड फुटबॉल विश्वात चर्चेत आला आहे.



कतारची अवस्था बिकट


सामन्याच्या 16व्या मिनिटाला सायले लॅरिन याने गोल करत कॅनडाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर डेव्हिडच्या गोलने कतारची बचावफळी पूर्णपणे कोलमडली.कतारच्या अडचणीत आणखी भर पडली जेव्हा 33व्या मिनिटाला होमन अहमद आणि 51व्या मिनिटाला अस्सिम मादिबो यांना रेड कार्ड दाखवण्यात आले. परिणामी कतारला जवळपास संपूर्ण दुसरा हाफ केवळ 9 खेळाडूंनी खेळावा लागला.यानंतर नाथन सालिबा याने फ्री-किकवर अप्रतिम गोल केला, तर मोहम्मद मनाई याच्या आत्मघाती गोलमुळे कॅनडाची आघाडी 5-0 झाली. अखेरीस डेव्हिडच्या तिसऱ्या गोलने कॅनडाने 6-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला.








 

स्वित्झर्लंडचा बोस्नियावर 4-1 विजय

दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडने बोस्निया-हर्जेगोविनावर 4-1 अशी मात करत ग्रुप-बीमध्ये आपले स्थान मजबूत केले. या विजयासह स्वित्झर्लंड गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या जोहान मंजाम्बीने केवळ 20 मिनिटांत दोन गोल करत सामन्याचे चित्रच बदलून टाकले. सामन्याच्या 74 व्या मिनिटाला मंजाम्बीने शानदार वॉली गोल केला. त्यानंतर 84 व्या मिनिटाला रुबिन वर्गासने आणि 90व्या मिनिटला मंजाम्बीने दुसरा गोल करत स्वित्झर्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. बोस्नियासाठी एरमिन माहमिकने अखेरच्या क्षणी एक गोल केला, मात्र तो केवळ पराभवाचे अंतर कमी करण्यापुरताच मर्यादित राहिला.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव