Nashik : 'आदिवासी विकास’मध्ये प्रथमच पेन्शन अदालत, आयुक्त लीना बनसोड यांनी जाणून घेतल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी

नाशिक : सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन व इतर सेवाविषयक समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एक नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड (Leena Bansod) यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी (दि.१९) प्रथमच 'पेन्शन अदालत' आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाद्वारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्यावर भर देण्यात आला.



'आदिवासी विकास’मध्ये प्रथमच पेन्शन अदालत


अनेकदा सेवानिवृत्तीनंतर पेन्शनची प्रकरणे, ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण किंवा इतर लाभांसाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. या त्रासातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मुक्त करण्यासाठी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी थेट पेन्शन अदालत भरवण्याचा निर्णय घेतला. या अदालतीमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक समस्या मांडल्या. आयुक्त बनसोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या तक्रारींचे गांभीर्याने निवारण करण्याच्या सूचना दिल्या.


यावेळी अपर आयुक्त (मुख्यालय) डिगांबर चव्हाण, सहआयुक्त रंजना किल्लेदार, उपायुक्त शशिकला अहिरराव, निलेश अहिरे, सहायक आयुक्त दिलीप खोकले, स्वाभिमानी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भरत पटेल, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे धनराज भरसट, पी. डी. जोपळे, शरद वाणी, एस. बी. बधान, जानकी कहांडोळे, डी. बी. तांबोळी आदी उपस्थित होते. दरम्यान, आदिवासी विकास विभागातील प्रशासकीय सुलभता आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आयुक्त बनसोड सातत्याने पुढाकार घेत आहेत. या उपक्रमाचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून विशेष स्वागत करण्यात आले आहे.



आता अपर आयुक्तस्तरावर पेन्शन अदालत होणार


राज्यस्तरीय पेन्शन अदालतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. त्यांचे बहुतांश प्रश्न अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालय यांच्याशी संबधित होते. त्यामुळे अपर आयुक्तस्तरावर पेन्शन अदालत घेऊन सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आदेश आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी दिले.


आदिवासी विकास विभागासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणे हे केवळ प्रशासकीय कर्तव्य नसून, ती आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यांना न्याय मिळवून देणे ही विभागाची प्राथमिकता आहे. या प्रकारच्या अदालती भविष्यातही नियमितपणे आयोजित केल्या जातील.
लीना बनसोड, आयुक्त आदिवासी विकास विभाग

Comments
Add Comment

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Waste to Best : मक्याच्या टाकाऊ सालींपासून बनवा घरासाठी 'या' अप्रतिम वस्तू; स्मार्ट गृहिणींचा हा भन्नाट जुगाड

Waste to Best : पावसाळ्यात प्रत्येकाला मक्याचे कणीस खायला आवडते. बाजारातून आई सुध्दा मक्के आणत असते. पण मका खाल्ल्यानंतर,

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

India Grasslands Guide 2026 : भारताने सादर केली UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि खुल्या परिसंस्थांवरील पहिली सर्वसमावेशक मार्गदर्शिका

India Grasslands Guide 2026 : भारताने १७ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक अधिवेशनाच्या (UNCCD) १७ व्या परिषदेत (COP17)

Gift Ideas For Raksha Bandhan 2026 : आपल्या लाडक्या बहिणींना कमी बजेटमध्ये द्या 'ही' सुंदर आणि खास गिफ्ट्स; चेहऱ्यावर येईल हसू

मुंबई : बहिणी-भावाचं नातं हे प्रेम, मस्ती आणि आयुष्यभराच्या आठवणींनी भरलेलं असतं. बहिणीला गिफ्ट देण्यासाठी

Aus vs Ban Test : डार्विनमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; जॅक वेदरल्ड संघाबाहेर, मॅथ्यू रेनशॉला बोलावले

डार्विन : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघात महत्त्वाचा बदल