PhonePe वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी ! वॉलेट वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असताना PhonePe ने आपल्या वॉलेट वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. बराच काळ वापरात नसलेल्या वॉलेटवर आता ‘वॉलेट इनॲक्टिव्हिटी मेंटेनन्स फी’ आकारली जाणार आहे. त्यामुळे निष्क्रिय वॉलेटधारकांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता आहे.



वॉलेट वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू


PhonePe च्या नव्या नियमानुसार, एखाद्या वॉलेटमधून सलग 365 दिवस कोणताही थेट आर्थिक व्यवहार झाला नाही, तर ते वॉलेट निष्क्रिय मानले जाईल. केवळ ॲप उघडणे, बॅलन्स तपासणे किंवा UPI व्यवहार करणे याला वॉलेट सक्रियता मानले जाणार नाही. वॉलेटमधील शिल्लक वापरून पेमेंट करणे किंवा पैसे पाठवणे आवश्यक असेल.



अशा निष्क्रिय वॉलेटसाठी कंपनी दर तीन महिन्यांनी जीएसटीसह 100 रुपयांची ‘वॉलेट इनॲक्टिव्हिटी मेंटेनन्स फी’ आकारणार आहे. वॉलेटमध्ये 100 रुपये किंवा त्याहून अधिक शिल्लक असल्यास ही रक्कम थेट वजा केली जाईल. शिल्लक 100 रुपयांपेक्षा कमी असल्यास उपलब्ध रक्कमच कापली जाईल. मात्र वॉलेटमध्ये नकारात्मक शिल्लक निर्माण होणार नाही.


कंपनीकडून कोणतेही शुल्क वजा करण्यापूर्वी वापरकर्त्यांना नोटिफिकेशन किंवा संदेशाद्वारे आगाऊ सूचना दिली जाणार आहे. सूचना मिळाल्यानंतरही वॉलेटचा वापर न झाल्यास देखभाल शुल्क आकारले जाईल.


हे शुल्क टाळण्यासाठी वर्षातून किमान एकदा वॉलेटमधील शिल्लक वापरून छोटासा व्यवहार करणे पुरेसे ठरेल. तज्ज्ञांच्या मते, डिजिटल वॉलेट नियमितपणे तपासणे आणि आवश्यकतेनुसार त्यातील शिल्लक वापरणे ही चांगली सवय आहे. त्यामुळे अनावश्यक शुल्क टाळता येईल आणि वॉलेटही सक्रिय राहील.

Comments
Add Comment

Pune Crime : 'आधी तुझे अर्धनग्न फोटो पाठव, मग...'; 23 वर्षांच्या भोंदू बाबाचा धक्कादायक कारनामा उघड

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondawa) परिसरात स्वतःला अध्यात्मिक गुरु सांगणाऱ्या एका तरुणाने नकारात्मक ऊर्जा काढून

iPhone 18 Launch Date Out ? : आयफोन १८ सिरीजची उत्सुकता शिगेला! कधी होणार ॲपलचा मोठा इव्हेंट ? वाचा सविस्तर

जगातील अव्वल तंत्रज्ञान कंपनी 'ॲपल' (Apple) आपल्या नव्या उपकरणांसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कंपनी

Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding : तब्बल १० वर्षांनंतर पूर्ण झाली इच्छा; स्कॉटिश खासदार मार्टिन डे यांनी केरळच्या नितिन चंद यांच्यासोबत मंदिरात केले पारंपरिक लग्न

केरळ : स्कॉटलंडच्या संसद सदस्य (MSP) मार्टिन डे आणि केरळच्या नितिन चंद यांनी प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई, गंगापूर रोडवरील ‘या' हॉटेलचा परवाना निलंबित

Nashik FDA Raid : नाशिकमध्ये एफडीएकडून कारवाईचे सत्र सुरु आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या, नियमांचे उल्लंघन

Prince Harry Meghan Markle UK Return : सहा वर्षांचा ‘वनवास’ संपणार? प्रिन्स हॅरी आणि मेगन ब्रिटनमध्ये परतण्याच्या तयारीत; मुलं शाही कुटुंबाच्या जवळ जाणार

लंडन : ब्रिटिश शाही कुटुंबापासून दूर झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल

Cancer Vaccine : कॅन्सरवरील उपचारात मोठा चमत्कार! मॉडर्ना आणि मर्कची नवीन लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता

कर्करोगाची गाठ पुन्हा न होण्यासाठी वैयक्तिककृत 'mRNA' लस ठरतेय प्रभावी; अंतिम चाचणीत मोठे यश कॅन्सर (कर्करोग) या