Friday, June 19, 2026

NASHIK : निदा खानच्या अर्जावर आता 'या' तारखेला पुढील सुनावणी

NASHIK : निदा खानच्या अर्जावर आता 'या' तारखेला पुढील सुनावणी

NASHIK : नाशिकमधील बहुचर्चित TCS प्रकरणातील निदा खान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिकमधील अत्याचार, धर्मांतरण प्रकरणी निदा खान, तौसिफ अत्तार आणि दानिश शेख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज न्यायालयात पार पडली. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

दरम्यान, न्यायालयात यापूर्वी आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आज न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि बाजू ऐकून घेतली. दोन्ही बाजूंचं म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल तूर्तास राखून ठेवला आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाची पुढील सुनावणी आता 25 तारखेला होणार आहे.

तोपर्यंत आरोपींचा मुक्काम तुरुंगातच राहणार असून 25 जूनला निदा खान आणि इतर दोघांबाबत पुन्हा न्यायालयात सुनावणी होईल. दरम्यान या प्रकरणात संशयितांना न्यायालय दिलासा देणार की त्यांचा जामीन फेटाळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >