Thursday, June 18, 2026

Pune Crime : हॉटेलच्या बंद खोल्यांत चालले होत 'ते' कांड, पुणे पोलिसांची छापा पडताच खळबळ

Pune Crime : हॉटेलच्या बंद खोल्यांत चालले होत 'ते' कांड, पुणे पोलिसांची छापा पडताच खळबळ

पुणे : पुणे (Pune) शहर गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने (AHTC) शिवाजीनगर (Shivaji Nagar) परिसरात मोठी कारवाई करत दोन हॉटेल्समधून तीन महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणात दोन संशयित एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (Pune Crime)

"> " class="section-post-content-internal-post-title">Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात;दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला आणि केली पाहणी  ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील आर.सी. पाटील पुलाजवळ  (R.C. Patil Bridge)गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ...

पुणे पोलिसांचा छापा 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये महिलांना बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसायासाठी (Prostitution) भाग पाडले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पडताळणी केली. माहिती सत्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित हॉटेलवर छापा टाकला. (Crime News)

या कारवाईदरम्यान एका महिलेची सुटका करण्यात आली. तिच्या चौकशीतून परिसरातील दुसऱ्या हॉटेलमध्ये आणखी काही महिलांना अशाच प्रकारे अडकवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने दुसऱ्या हॉटेलवरही छापा टाकला.

या दुसऱ्या कारवाईत आणखी दोन महिलांची सुटका करण्यात आली. त्यापैकी एक महिला दुसऱ्या राज्यातील असून दुसरी परदेशी नागरिक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सर्व महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची वैद्यकीय तपासणी व आवश्यक समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Pune Prostitution)

एजंटांविरुध्द गुन्हा दाखल 

या प्रकरणी दोन कथित एजंटांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (Indian Judicial Code) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या रॅकेटचे इतर धागेदोरे शोधण्याचे काम सुरू असून आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याची चौकशी केली जात आहे.

"> " class="section-post-content-internal-post-title">Mumbai Nashik Highway Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात;दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला आणि केली पाहणी  ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील आर.सी. पाटील पुलाजवळ  (R.C. Patil Bridge)गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ...

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात मानवी तस्करी आणि महिलांच्या शोषणाविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी नागरिकांनाही संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा