बारामती : पुण्यातील बारामती (Baramati) तालुक्यातील पणदरे खिंडीत आज सकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. निरा-बारामती मार्गावर धावणाऱ्या CNG ST बसला अचानक आग (Fire) लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने चालक, वाहक आणि प्रवाशांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Baramati Bus Fire)
माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बस पणदरे खिंडीतून निराच्या दिशेने जात असताना चालकाच्या लक्षात आले की बसमधून धूर निघत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवली.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग ( जी एम एल आर) प्रकल्प टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात जुळ्या बोगद्याच्या ...
यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना त्वरित खाली उतरवण्यात आले. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची तीव्रता इतकी होती की काही वेळातच बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर करण्याच्या उद्देशाने कांजूरमार्ग डम्पिंग ...
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर ST प्रशासनानेही घटनेची दखल घेतली असून बसला आग कशामुळे लागली याचा सखोल तपास केला जाणार आहे.






