Pakistan Take Action In Bay of Bengal : चीनच्या मदतीने ५५ वर्षांनंतर बंगालच्या खाडीत पाकिस्तानची पुनरागमनाची तयारी; भारताची चिंता वाढणार?

इस्लामाबाद : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील पराभवानंतर बंगालच्या खाडीतून जवळपास पूर्णपणे माघार घेतलेल्या पाकिस्तानने आता पुन्हा या रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या सागरी क्षेत्राकडे मोर्चा वळवला आहे. तब्बल ५५ वर्षांनंतर पाकिस्तान बंगालच्या खाडीत आपली नौदल उपस्थिती वाढवण्याच्या तयारीत असून, त्यासाठी चीनकडून मिळालेली अत्याधुनिक ‘हंगोर’ पाणबुडी तैनात करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Pakistan Take Action In Bay of Bengal)


गेल्याच आठवड्यात चीनने पाकिस्तानला हंगोर वर्गातील पहिली पाणबुडी सुपूर्द केली. ही पाणबुडी कराची बंदरात दाखल झाली असून, भविष्यात तिला बंगालच्या खाडीत तैनात करण्याचा पाकिस्तानचा मानस असल्याचे वृत्त आहे. या हालचालीमुळे भारतीय नौदलासमोर नवीन आव्हान उभे राहू शकते. (Pakistan Take Action In Bay of Bengal)



‘हंगोर’ नावामागचा इतिहास :


पाकिस्तानने नव्या पाणबुडीला ‘हंगोर’ हे नाव देण्यामागेही एक ऐतिहासिक संदर्भ आहे. १९७१ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानच्या जुन्या हंगोर पाणबुडीने भारतीय नौदलाची आयएनएस खुखरी युद्धनौका बुडवली होती. त्याच घटनेची आठवण कायम ठेवण्यासाठी आणि प्रतीकात्मक संदेश देण्यासाठी पाकिस्तानने नव्या पाणबुडीलाही तेच नाव दिल्याचे मानले जाते. (Pakistan Take Action In Bay of Bengal)



बंगालच्या खाडीत उपस्थिती वाढवण्याची योजना :


पाकिस्तान नौदलातील वरिष्ठ अधिकारी या योजनेवर चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, या नव्या पाणबुडीमुळे पाकिस्तानला बंगालच्या उपसागरात आपली उपस्थिती अधिक प्रभावीपणे टिकवून ठेवता येईल. १९७१ नंतर बंगालच्या खाडीत पाकिस्तानची नौदल क्षमता जवळपास नगण्य राहिली होती. पाकिस्तानच्या मुख्य नौदल तळांपासून हा भाग खूप दूर असल्याने तेथे दीर्घकालीन उपस्थिती राखणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. त्यामुळे ही योजना महत्त्वाकांक्षी असल्याची कबुली पाकिस्तानमधील संरक्षण तज्ज्ञही देत आहेत. (Pakistan Take Action In Bay of Bengal)



चीन-पाकिस्तान नौदल सहकार्याला वेग : 


चीनकडून पाकिस्तान एकूण आठ अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करत आहे. या करारामुळे पाकिस्तानच्या नौदल क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असल्याचे मानले जाते. हंगोर वर्गातील या पाणबुड्या आधुनिक शस्त्रास्त्रे आणि दीर्घकालीन मोहिमांसाठी सक्षम मानल्या जातात. (Pakistan Take Action In Bay of Bengal)



भारतासाठी नवे आव्हान?


अलीकडच्या काळात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सुधारत असताना, दुसरीकडे हिंदी महासागर क्षेत्रात नौदल स्पर्धाही वाढत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानची बंगालच्या खाडीकडे पुन्हा वाढलेली सक्रियता भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते. १९७१ नंतर ज्या क्षेत्रातून पाकिस्तान जवळपास अदृश्य झाला होता, त्याच बंगालच्या खाडीत आता पुन्हा पाय रोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने दक्षिण आशियातील सागरी समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Pakistan Take Action In Bay of Bengal)

Comments
Add Comment

Pakistan Occupied Kashmir : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर गोळीबार; १९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी प्रशासनाविरोधात नागरिकांचा तीव्र उद्रेक झाला असून तेथील

Trump Warns Israel : "आम्ही कोणाशी डील करावी हे कोणी शिकवू नये," ट्रम्प यांचा इस्रायलला दम

अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचे

Seattle Food Festival Firing : सिएटलमधील लोकप्रिय फूड फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबाराचा थरार; परिसरात भीतीचे वातावरण

सिएटल : अमेरिकेतील सिएटल शहरात एका लोकप्रिय फूड फेस्टिव्हलदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

France Wildfire : स्पेन-फ्रान्समध्ये आगीचा कहर; २.६५ लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर, एकाचा मृत्यू

पॅरिस : युरोपमधील स्पेन आणि फ्रान्स या देशांमध्ये भीषण वणव्याने (France Wildfire) थैमान घातले असून परिस्थिती दिवसेंदिवस

H-1B Visa Fee : एच-१बी व्हिसावरील १ लाख डॉलर शुल्कासंदर्भात अमेरिकेच्या न्यायालयाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारतीय कामगारांना मोठा दिलासा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि रोजगार धोरणांबाबतीत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

Attack On Aramco: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल आणि ड्रोन हल्ला; अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम अपयशी

मध्यपूर्वेतील (Middle East) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. जगातील