Nandgaon Crime : नांदगाव येथे शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षण विभागाच्या कारभाराचा निषेध करत पोषण आहार कर्मचारी संगीता सोनवणे यांनी थेट विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Nashik Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (गुरुवार) सकाळी ८ वाजेपासून मतदान प्रक्रियेला ...
पूर्वसूचना न देता कामावरून काढले
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नांदगाव नगरपालिकेच्या (Nandgaon Municipal Council) शाळांमध्ये पोषण आहार शिजविणाऱ्या काही महिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात संबंधित महिलांनी आंदोलन छेडले होते. संगीता सोनवणे (Sangita Sonawane) यांनी यापूर्वीही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.
यासंदर्भात बाधित महिला कर्मचारी मैदानावर एकत्र जमल्या होत्या. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय न घेता चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी वाढली.
Nashik Crime News : नाशिक शहरातील तपोवन परिसरातील केवडीबन येथे मंगळवारी एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, आढळलेल्या महिलेच्या ...
प्रकृती चिंताजनक; मालेगावला हलविले
अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत संगीता सोनवणे यांनी विषप्राशन केले. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती खालावल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना मालेगाव येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर नांदगावमध्ये राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.





