तरुणांमध्ये वाढतोय Silent Heart Attack चा धोका!

वेळीच ओळखा ही लक्षणे


अलीकडच्या काळात हृदयविकाराचा झटका केवळ ज्येष्ठांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बदलती जीवनशैली, ताणतणाव, अपुरी झोप, संतुलित आहार वेळेत न घेणे आणि  व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्येही हृदयाशी संबंधित समस्या वाढताना दिसत आहेत. विशेषतः "सायलेंट हार्ट अटॅक" (Silent Heart Attack)  हा प्रकार चिंतेचा विषय ठरत आहे.



सामान्य हार्ट अटॅकमध्ये छातीत तीव्र वेदना जाणवतात. मात्र सायलेंट हार्ट अटॅकमध्ये लक्षणे अतिशय सौम्य किंवा अस्पष्ट असू शकतात. त्यामुळे अनेकांना हार्ट अटॅक आल्याचेही कळत नाही. हीच बाब अधिक धोकादायक ठरते.


तज्ज्ञांच्या मते, सतत थकवा जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे, चक्कर येणे किंवा छातीत हलकी अस्वस्थता जाणवणे ही सायलेंट हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. काही वेळा जबडा, मान, पाठ किंवा खांद्यात वेदना जाणवू शकतात. अनेकजण ही लक्षणे सामान्य थकवा किंवा गॅसची समस्या समजून दुर्लक्ष करतात.


मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान आणि कौटुंबिक हृदयविकाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींमध्ये धोका अधिक असतो. तसेच सतत तणावाखाली राहणाऱ्या आणि शारीरिक हालचाल कमी असलेल्या तरुणांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.




सायलेंट हार्ट अटॅकचा बचाव काही गोष्टी नियमितपणे केलेच पाहिजे. सायलेंट हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण महत्त्वाचे आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी करून रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी शरीर देत असलेल्या छोट्या संकेतांकडे लक्ष द्या. वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्यास गंभीर धोका टाळता येऊ शकतो.

Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८