Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८ टक्के भरले आहे. मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. लवकरच बारवी धरण ओसंडून वाहू लागेल, अशी स्थिती आहे. रविवारी ९ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या नोंदीनुसार बारवी धरण ९९.८८ टक्के भरले आहे. बारवी धरणाची सध्याची पाणीपातळी आणि ओव्हरफ्लो पातळी यांत केवळ ०.०१ मीटरचे अंतर उरले आहे.



एमआयडीसी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बारवी धरणाची सध्याची पाणीपातळी ७२.५९ मीटर झाली आहे. धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठा ३३८.४४ दशलक्ष घनमीटरवर पोहोचला आहे. बारवी धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही तासांत धरण ओसंडून वाहू लागण्याची शक्यता आहे.



धरणातील वाढत्या पाणीसाठ्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. धरणाच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने विसर्ग करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारवी धरण लवकर भरल्याने पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या २४ तासांत बारवी धरण पूर्ण भरून ओसंडून वाहू लागण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Instant Sweet Recipes for Festivals : सणासुदीच्या दिवसात घरच्या घरी बनवा या इन्स्टंट मिठाईचे प्रकार; कमी वेळात तयार होईल गोड मेजवानी!

मुंबई : सणासुदीचे दिवस सुरू झाले की घरात गोडधोड पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव, गौरी-गणपती, नवरात्र

Mumbai Airport : मुंबई आणि नवी मुंबईतील विमान प्रवाशांसाठी बदलणार हवाई प्रवासाचं नियोजन

मुंबई : मुंबईतील विमान प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानतळावरील टर्मिनस १ च्या पुनर्विकास

Self Improvement : तुम्ही कोणाचंच वाईट करत नाही, तरीही लोक तुम्हाला एकटं पाडतात? 'या' चुका ठरतात कारणीभूत

तुम्ही कोणाचं वाईट करत नसतानाही लोक तुमच्यापासून दुरावत असतील, तर त्याला तुमच्या नकळत

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Vishwa Hindu Parishad : दुर्गापूजा मंडपांमध्ये मांसाहारी पदार्थ टाळण्याचे विहिंपचे आवाहन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेकडून (विहिंप) पूजा आयोजकांसाठी