PM Modi - PM Meloni : G7 मध्ये पुन्हा रंगली ‘मोदी-मेलोनी’ची मैत्री! “आपण इंस्टाग्रामवर सर्वाधिक प्रसिद्ध”, मेलोनींच्या शुभेच्छांनी वेधलं लक्ष

फ्रान्स : फ्रान्समधील एव्हियान येथे पार पडलेल्या G7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीने अनेक राजनैतिक घडामोडी घडल्या. मात्र, या सर्वांमध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील खास केमिस्ट्री. भेटीदरम्यान मेलोनी यांनी मोदींना हसत-खेळत शुभेच्छा देताना, “पुन्हा भेटून आनंद झाला. आपण इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत,” असे म्हणत वातावरण हलकेफुलके केले. (PM Modi - PM Meloni)


G7 परिषदेदरम्यान मोदींनी अनेक जागतिक नेत्यांशी संवाद साधला. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यासोबतची भेट विशेष चर्चेत राहिली. सुमारे पाच मिनिटांच्या या चर्चेत दोन्ही नेत्यांनी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. परिषदेतील एका सत्रात दोघेही एकत्र बसलेले दिसले. फेब्रुवारी २०२५ मध्ये व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीनंतर तब्बल १६ महिन्यांनी ही प्रत्यक्ष भेट झाली. (PM Modi - PM Meloni)


भारत-अमेरिका व्यापार करार, शुल्क धोरण, गुंतवणूक आणि सामरिक भागीदारी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी मोदींचे स्वागत केले. परिषदेत सहभागी देशांच्या प्रमुखांचे सामूहिक छायाचित्रही काढण्यात आले. (PM Modi - PM Meloni)



मोदींचा जागतिक विश्वासावर भर :


‘नवीन भागीदारी निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय एकतेचे नूतनीकरण करणे’ या विषयावरील उच्चस्तरीय सत्रात मोदींनी जागतिक विश्वास आणि सहकार्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, आजचे जग अधिक परस्परावलंबी झाले असले तरी कोणतीही भागीदारी विश्वासाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.


“आज जगात संसाधनांची नव्हे तर विश्वासाची कमतरता आहे. भविष्यातील भागीदारी ही विश्वास पुनर्स्थापित करण्यावर अवलंबून असेल,” असे मोदी म्हणाले. तसेच ग्लोबल साउथ देशांना केवळ मदतीची नव्हे तर समान भागीदारीची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. (PM Modi - PM Meloni)



G7 म्हणजे नेमके काय?


G7 म्हणजे ‘ग्रुप ऑफ सेव्हन’ हा जगातील सात प्रगत अर्थव्यवस्थांचा समूह आहे. यात अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जपान, इटली, कॅनडा आणि जर्मनी यांचा समावेश आहे. १९७५ मध्ये G6 म्हणून सुरू झालेल्या या समूहात १९७६ मध्ये कॅनडाचा समावेश झाल्यानंतर त्याचे G7 असे नामकरण झाले. काही काळ रशियाचा समावेश करून G8 करण्यात आले होते, मात्र २०१४ मध्ये रशियाला बाहेर काढल्यानंतर समूह पुन्हा G7 म्हणून कार्यरत आहे. भारत हा G7 चा सदस्य नसला तरी जगातील प्रमुख अर्थव्यवस्था आणि वाढत्या जागतिक प्रभावामुळे भारताला दरवर्षी विशेष निमंत्रित देश म्हणून परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती G7 परिषदेत नेहमीच विशेष महत्त्वाची मानली जाते. (PM Modi - PM Meloni)

Comments
Add Comment

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना