Indo-Pacific Command : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय; 'इंडो-पॅसिफिक कमांड'चे नाव बदलून केले ’पॅसिफिक कमांड’

अमेरिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आपल्या यूएस इंडो-पॅसिफिक कमांड (यूएसइंडोपाकॉम) चे नाव बदलून पुन्हा यूएस पॅसिफिक कमांड (यूएसपीएसीओएम) असे केले आहे. यासोबतच २०१८ मध्ये घेतलेला आठ वर्षांपूर्वीचा निर्णयही मागे घेण्यात आला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने मंगळवारी याची घोषणा करताना सांगितले की, हा बदल कमांडच्या ऐतिहासिक गौरवशाली परंपरेचा आणि वारशाचा सन्मान करण्यासाठी करण्यात आला आहे. (Indo-Pacific Command)


या कमांडची स्थापना १९४७ मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी केली होती. संरक्षण विभागाच्या निवेदनानुसार, “१ जानेवारी १९४७ रोजी स्थापन झालेली ही कमांड ७० हून अधिक वर्षे यूएस पॅसिफिक कमांड या नावाने कार्यरत होती. ही अमेरिकाच्या एकात्मिक लष्करी कमांडपैकी सर्वात जुनी आणि सर्वात मोठी कमांड आहे.” विशेष म्हणजे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात २०१८ मध्ये या कमांडचे नाव बदलून यूएस इंडो-पॅसिफिक कमांड करण्यात आले होते. (Indo-Pacific Command)


अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालय पेंटागॉनने म्हटले आहे की, जुन्या नावाची पुनर्स्थापना केल्याने कमांडच्या ऐतिहासिक मुळांचा सन्मान होईल आणि प्रशांत क्षेत्रात तैनात असलेल्या सैनिकांमध्ये अभिमान व एकात्मतेची भावना अधिक बळकट होईल. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “दुसऱ्या महायुद्धानंतरच्या प्रादेशिक सुरक्षा व्यवस्थेच्या उभारणीपासून ते कोरियन युद्ध, व्हिएतनाम युद्ध आणि विविध मानवतावादी मोहिमांच्या समन्वयापर्यंत, यूएस पॅसिफिक कमांड हे नाव लष्करी वारसा आणि प्रादेशिक भागीदारीचे प्रतीक राहिले आहे.” (Indo-Pacific Command)



संरक्षण विभागाच्या मते, नाव बदलले असले तरी कमांडच्या कार्यक्षेत्रात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या कमांडचे कार्यक्षेत्र अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून भारताच्या पश्चिम सीमेपर्यंत विस्तारलेले आहे. पेंटागॉनने स्पष्ट केले की, कमांडचे मूलभूत ध्येय आणि प्रादेशिक मित्रदेशांसोबत मिळून मुक्त व खुले क्षेत्र कायम ठेवण्याची बांधिलकी पूर्वीप्रमाणेच कायम राहील. (Indo-Pacific Command)


2018 मध्ये तत्कालीन अमेरिकन संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी या कमांडचे नाव बदलून इंडो-पॅसिफिक कमांड करण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर यांच्यात वाढत असलेली सामरिक व आर्थिक परस्परसंलग्नता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. त्या वेळी मॅटिस यांनी म्हटले होते की, ही कमांड “बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आणि पेंग्विनपासून ध्रुवीय अस्वलांपर्यंत” पसरलेल्या विशाल क्षेत्राची जबाबदारी सांभाळते आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण धोरणात तिची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. (Indo-Pacific Command)



२०१८ मध्ये यूएस पॅसिफिक कमांड चे नाव बदलून इंडो-पॅसिफिक कमांड करण्यात आले, तेव्हा त्याकडे अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या सामरिक संबंधांचे प्रतीक म्हणून पाहिले गेले होते. गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक महत्त्वाचे करार झाले असून त्यामुळे दोन्ही देशांतील सामरिक भागीदारी अधिक मजबूत झाली होती.मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंधांमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. प्रथम शुल्कवाढीच्या (टॅरिफ) मुद्द्यावर आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर संदर्भातील युद्धविरामाच्या प्रश्नावर भारत आणि अमेरिकेच्या सरकारांमध्ये मतभेद समोर आले. या पार्श्वभूमीवर आता इंडो-पॅसिफिक कमांडचे नाव पुन्हा पॅसिफिक कमांड करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, हा केवळ ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याचा निर्णय असू शकतो, तर काहींच्या दृष्टीने तो अमेरिकेच्या बदलत्या सामरिक प्राधान्यक्रमांचे संकेत मानला जात आहे. (Indo-Pacific Command)

Comments
Add Comment

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना