VASAI SIR : वसईत SIR संदर्भात महत्त्वाची बैठक; खासदार किरीट सोमय्या व आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी घेतली परिसराची पाहणी

वसई: वसई विधानसभा क्षेत्रातील एस.आय.आर. (SIR) संदर्भात आज वसई तहसीलदार कार्यालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश एस.आय.आर. प्रमुख खासदार किरीट सोमय्या आणि वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.



बैठकीतील प्रमुख मुद्दे:


या बैठकीत मतदार नोंदणी, नागरिकांच्या विविध तक्रारी आणि प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित सरकारी विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.



परिसराची केली प्रत्यक्ष पाहणी:


बैठकीनंतर खासदार किरीट सोमय्या आणि आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी पाचूबंदर, गास टाकीपाडा, कोळीवाडा आणि एकचोटी गाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेषतः परिसरातील अनधिकृत बांधकामे, अवैध झोपडपट्ट्या आणि संशयित बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तक्रारींची त्यांनी गंभीर दखल घेतली असून, या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.



कायदेविषयक कार्यवाहीची मागणी:


स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वसईच्या नियोजित विकासासाठी आणि जनहिताच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.



उपस्थित मान्यवर:


यावेळी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, वसई-विरार शहर महानगरपालिकेचे उपायुक्त अजित मुठे, प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त संगीता घाडीगांवकर, नायब तहसीलदार राजाराम देवकाते, पोलीस निरीक्षक सौरभी पवार आणि पोलीस निरीक्षक विशाल वाळवी उपस्थित होते. तसेच, भाजपा वसई शहर मंडळ अध्यक्षा गीतांजली दरीवाला, वसई पश्चिम मंडळ अध्यक्ष आशिष जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर

Tehsildar Promotion : ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, तर २५ नायब तहसीलदार तहसीलदारपदी पदोन्नत

मुंबई : महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Cow Breed & Sheep Breed : महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान; उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर 'माडग्याळ' प्रजातीच्या

AI smart goggles : 'एआय स्मार्ट गॉगल्स'च्या वापराबाबत येणार निर्बंध; राज्य सरकारचे'एसओपी' तयार करण्याचे निर्देश

सायबर विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने