Singer Sonu Nigam: 'असह्य वेदना होत आहेत'; सोनू निगमने सांगितली गंभीर आरोग्य समस्या

मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) सध्या गंभीर आरोग्य समस्येचा सामना करत असून याबाबतची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर (Social Media) व्हिडीओद्वारे दिली आहे. मानेतील एक नस दबल्यामुळे असह्य वेदना होत असल्याचे सांगत त्यांनी चाहत्यांशी संवाद साधला.



व्हिडीओमध्ये सोनू निगम म्हणाले की, "मी सध्या अत्यंत कठीण आणि त्रासदायक परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे माझा आवाजही तुम्हाला वेगळा आणि जड वाटत असेल. माझ्या मानेतील एक नस दबली गेली आहे, ज्यामुळे मला प्रचंड वेदना होत आहेत."


या त्रासामुळे त्यांना एमआरआय आणि सीटी स्कॅनसारख्या वैद्यकीय चाचण्या कराव्या लागल्या असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


आरोग्याच्या समस्येमुळे अनेकांनी त्यांना लाइव्ह कॉन्सर्ट पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, चाहत्यांना निराश न करण्याचा निर्णय घेतल्याचे सोनू निगम यांनी स्पष्ट केले.


"इतका शारीरिक त्रास होत असतानाही माझे गाणे ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांना निराश करणे योग्य वाटले नाही. त्यामुळे मी शो रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे," असे ते म्हणाले.






सोनू निगम यांनी ही माहिती शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.

Comments

Sunil Sathe    June 18, 2026 07:45 AM

Get soon well.

Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत